कपूर कुटुंबातील सुना, मुलं, मुली आणि जावई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीच्या एका खास जेटने रवाना झाले आहेत. मोदींजींशी भेट आणि एका स्पेशल सोहळ्यासाठी ते नरेंद्र मोदीजींना आमंत्रित करण्यासाठी तेथे गेले आहेत.
रणबीर, करीना, करिश्मा, आलिया, सैफ आणि नीतू कपूर ही मंडळी आज १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेले. या भेटीचं स्पेशल कारण आहे. खरं म्हणजे १४ डिसेंबर या दिवशी हिंदी सिनेमाचे शोमॅन माननीय राज कपूर यांची १०० जयंती आहे. आणि कपूर कुटुंबियांना हा दिवस यादगार करावयाचा आहे. याच संदर्भात हे कुटुंब मोदीजींना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यासाठी गेली आहेत.
कपूर कुटुंबातील काही मंडळी मुंबईतील कलीना प्रायव्हेट एअरपोर्टवर दिसली. हे सर्व प्रायव्हेट जेटने दिल्लीला जात होते. करीना पती सैफ अली सोबत होती. तर करीश्मा, काकी नीतू कपूर सोबत दिसली आणि रणबीर आलिया एकत्र दिसले. हे सर्वच मोदीजींना आमंत्रण देण्यासाठी गेले होते. राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १३ ते १५ डिसेंबर एक सोहळा होणार आहे. राज कपूर यांचे काही चित्रपट देखील सिनेमागृहांमध्ये दाखवण्यात येत आहेत.