Close

करीनाच्या लेकानं तैमूरनं जिंकली सर्वांची मने; सोशल मीडियावर होतंय छोट्या तैमूरचं कौतुक (Kareena Posted A Photo Of Taimur Holding Her Slippers On Social Media)

करीना कपूर आणि लेक तैमूर या मायलेकाची जोडी सध्या चर्चेत आली आहे. तैमुर आपल्या आईच्या चपला हातात घेऊन तिची मदत करताना दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी

आई-बाळाचं नातं हे सर्व नात्यांपैकी खास असतं. मग ते सेलिब्रिटी असो किंवा सामन्य नागरिक. ते नात खरंच असतं. सेलिब्रिटींच्या मुलांबद्दलही चाहत्यांनी जाणून घेण्यात फार उत्सुकता असते. सेलिब्रिटींप्रमाणे स्टारकिड्स जास्त चर्चेत असतातय. करीनाचा लाडका लेक तैमुरही एक कारणामुळे चर्चेत आला आहे.

अनेक कलाकार त्यांच्या मुलांबरोबरचे खास बॉण्डिंग नेहमीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अशातच सेलिब्रिटी आई-मुलाची जोडी म्हणजेच करीना कपूर व तैमूर अली खान. करीना व तैमूर यांची आई-मुलाची जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

बऱ्याचदा हे दोघे पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसतात. करीना नेहमीच वेळात वेळ काढून तिच्या मुलांना वेळ देताना दिसली आहे. पण आता ही माय-लेकाची जोडी एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे.

आईची सेवा, सोशल मीडियावर तैमुरचे कौतुक

नुकतेच करिनाने काही नवीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये टायमर दिसत आहेत. तैमूर पाठमोरा उभा असलेला दिसत आहे. इतकंच नव्हे तर तैमूरच्या हातात आईच्या चपलाही पाहायला मिळत आहेत. आईच्या चपला हातात घेऊन जाताना काढलेला हा तैमूरचा हा फोटो पोस्ट केला आहे.

करीनाने  हा फोटो पोस्ट करत  “आईची सेवा यावर्षी आणि कायम. नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रांनो. अधिक फोटो लवकरच येत आहेत, संपर्कात राहा” असं कॅप्शनही दिलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तैमूरचं कौतुक केलं आहे. शिवाय त्याच्यावरील संस्कारांचंही कौतुक केलं आहे.

सैफ अली खान नवीन वर्ष 2025 ला त्याच्या कुटुंबासह परदेशी सुट्टीसाठी गेला होता, तिथून हे फोटो करिनाने पोस्ट केले आहेत. करीना आणि सैफ दरवर्षी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी त्यांच्या मुलांसोबत सुट्टीवर जातात. यावेळीही ते गेले होते.

Share this article