बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबासह दिल्लीला गेली होती.
काल संपूर्ण कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. करीना कपूरही पती सैफ अली खानसोबत पंतप्रधान मोदींना भेटायला गेली होती. तिथून करीना कपूरने तिच्या दोन मुलांसाठी टिम आणि जेहसाठी खास भेट आणली आहे.
अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींसोबतच्या संपूर्ण कुटुंबाच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पीएम मोदी पती सैफ अली खान, भाऊ रणबीर कपूर, वहिनी आलिया भट्ट, बहीण करिश्मा कपूर आणि रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांच्यासोबत दिसत आहेत.
पीएम मोदींसोबतच्या या भेटीचे काही क्षण करिनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे पंतप्रधान मोदींचा त्यांच्या मुलांसाठीचा ऑटोग्राफ. पीएम मोदींनी टीमचे आणि जेहचे नाव लिहून त्यांचा ऑटोग्राफ दिला.
वा कपूर कुटुंब दिवंगत राज कपूर यांची 100 वी जयंती साजरी करत आहे. या प्रसंगी, करीना कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि करिश्मा कपूरसह संपूर्ण कपूर कुटुंब पीएम मोदींना 'राज कपूर फिल्म फेस्टिव्हल'साठी आमंत्रित करू इच्छित आहे.
या चित्रपट महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी कपूर कुटुंबाने दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
14 डिसेंबर रोजी दिवंगत राज कपूर यांची 100 वी जयंती आहे. पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड आणि फिल्म हेरिटेज फाउंडेशन चित्रपट निर्माता आणि अभिनेते राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आरके फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करणार आहेत.