करीना कपूर आपल्या आरोग्याची खूप काळजी घेणारी अभिनेत्री आहे. पण एक गोष्ट तिची एवढी फेव्हरेट आहे की, २ ते ३ दिवस जरी ती गोष्ट तिला मिळाली नाही तर करीना अस्वस्थ होते. कोणती आहे ती गोष्ट?
बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री स्वत:च्या आरोग्याबाबत आणि डाएटबाबत किती काटेकोर असतात. त्यामध्येच एक नाव आहे करीना कपूर खान. करीना ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या आरोग्याची खूप काळजी घेते. तिच्या अभिनय आणि स्टाईल व्यतिरिक्त, ती तिची फिगर मेंटेन करण्यासाठी चांगला डाएट घेते. पण सोबतच करीना खूप खवय्यी आहे. ती आपल्या जिभेचे चोचलेही पुरवते.
तिला दररोज काहीना काही तरी वेगळं खायला आवडतं. करीनाने एकदा सांगितले होते की ती रोज एकसारखे अन्न खाऊ शकत नाही. पण एक डिश अशी आहे जी करीनाला प्रचंड आवडते. ती या पदार्थासाठी इतकी वेडी आहे की २-३ दिवस जरी खाल्ली नाही तर तिला क्रेविंग सहन होत नाही. अलीकडेच एका कार्यक्रमात करीनाने तिच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितलं. कोणती डिश आहे माहितीये?

अलिकडेच करीना कपूर एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी ती अतिशय आकर्षक लूकमध्ये दिसली. तिने सैल डेनिम जीन्ससह जांभळ्या रंगाचा वर्क शर्ट घातला होता. यासोबतच तिने उंच टाचांचे शूजही घातले होते. तसेच तिने कमीत कमी मेकअपने लूक पूर्ण केला होता. करीनाचा लूकही चाहत्यांना आवडला. पण या कार्यक्रमात झालेल्या चर्चेमध्ये करीनाने तिच्या फेव्हरेट डिशबद्दलही सांगितलं.

या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करीनाने तिच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले. ती म्हणाली की तिचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे खिचडी. जर तिने 2 ते 3 दिवस जरी खिचडी खाल्ली नाही तर तिला क्रेविंग सहन होत नाही असंही तिने म्हटलं.
गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली. त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना सर्व कार्यक्रमांमधले करीनाचे सर्व लूक खूप आवडले . कधी ऑफ-व्हाइट रंगाच्या लेहेंग्यात तर कधी ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये, करीना अतिशय सुंदर दिसत होती. अलीकडेच करीनाने पती सैफ, मुले आणि संपूर्ण कुटुंबासह ईद साजरी केली. करीना ‘सिंघम अगेन’ चित्रपटात शेवटची दिसली होती. आता, ती लवकरच मेघना गुलजारच्या ‘दायरा’ आणि ‘वीरे दी वेडिंग 2’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.