सन मराठीवर कन्यादान या मालिके वृंदा आणि राणाची भूमिका साकारून अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने लोकप्रिय झाले. मालिकेत या दोघांची जोडी फार पसंत केली गेली.

आता या दोघांनी खऱ्या आयुष्यातही विवाह गाठ बांधली असेल सात जन्म एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले आहे. नुकताच अमृता आणि शुभंकरचा पुणेरी थाटात शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



दोन महिन्यांपूर्वीच अमृता आणि शुभंकर चा साखरपुडा पार पडला होता तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांना लग्नाची उत्सुकता होती. अमृता बने ही मूळची मुंबईची रहिवासी तर शुभंकर हा अस्सल पुणेरी मुलगा आहे. मालिकेच्या सेटवरच दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आज लग्नही पार पडले. कन्यादान मालिकेची टीम या लग्नाला उपस्थित होती.