जिरा आलू साहित्य: 3 मोठे बटाटे (चौकोनी आकारात कापून घ्या), दीड टीस्पून जिरे, दीड टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे पावडर, 2 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. कृती : कढईत तेल गरम करा. जिरे घाला. जिरे तडतडल्यावर आच कमी करून उर्वरित सर्व साहित्य घाला. झाकण ठेवून बटाटे मऊ होईपर्यंत शिजवा. मसाला जळल्यासारखा वाटल्यास त्यात थोडे पाणी शिंपडा. कोथिंबिरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
तिरंगी पॅटीस
साहित्य: अर्धा किलो उकडलेले बटाटे आणि रताळे. 2 चमचे आरारूट, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि काळी
मिरी पावडर.
सारणासाठी : अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, अर्धा कप किसलेले खोबरे, 1 टीस्पून तीळ, 1 टीस्पून जिरे, 2 टीस्पून साखर, 2 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर, 1 टीस्पून काजूचे तुकडे, 1 टीस्पून बेदाणे, अर्धा कप आरारूट पावडर , सैंधव मीठ आणि चवीनुसार काळी मिरी पावडर, तळण्यासाठी तेल
कृती: बटाटा आणि रताळे वेगवेगळे भांड्यात घेऊन दोघांमध्ये सैंधव मीठ, लिंबाचा रस, 2 टीस्पून आरारूट पावडर, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर टाकून मिश्रण तयार करा.
सारणासाठी : कढईत अर्धा चमचा तेल गरम करून त्यात तीळ, जिरे आणि काजू टाकून परतून घ्या. नंतर नारळ आणि शेंगदाणे घालून 2 मिनिटे परतून घ्या. आता बेदाणे, हिरवी मिरची पेस्ट, सैंधव मीठ, काळी मिरी पावडर, साखर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करुन सारण तयार करा.
रताळे आणि बटाट्याच्या मिश्रणाला लहान पुरीचा आकार द्या. बटाट्याच्या पुरीचा आकार रताळ्यापेक्षा थोडा लहान ठेवा. आता दोन्ही पुर्या एका वर एक ठेवा. सारणाचे मिश्रण मधोमध भरा आणि कडा जोडून गरम तेलात तळून घ्या. तयार पॅटीस मधोमध कापून खोबर्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.