Close

‘जाऊ बाई गावात’च्या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे ‘हे’ आहेत टॉप ५ स्पर्धक (Jau Bai Gavaat Top 5 Finalist)

छोट्या पडद्यावर प्रसारित होणारा आगळावेगळा असा 'जाऊ बाई गावात' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अभिनेता हार्दिक जोशीने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा उत्तमपणे पेलली आहे. या शोमध्ये शहरात आणि परदेशात सगळ्या सुखसुविधांचा वापर करून लहानाच्या मोठ्या झालेल्या काही तरुणी थेट गावात जाऊन कुठलीही सुविधा न वापरता तिथल्या लोकांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या दरम्यान अनेकदा वादांच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. 'जाऊ बाई गावात'च्या निमित्ताने हार्दिक जोशी पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसला. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या कार्यक्रमात विजेती कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे आहेत टॉप ५ स्पर्धक

'जाऊ बाई गावात' हा अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला कार्यक्रम अल्पावधीतच लोकांना पसंत पडला. आता सगळ्यांचे लक्ष फिनालेकडे लागले आहेत. ‘रमशा फारुकी’, ‘रसिक ढोबळे’, ‘संस्कृती साळुंके’, ‘स्नेहा भोसले’ आणि ‘श्रेजा म्हात्रे’ या स्पर्धकांनी टॉप ५ पर्यंत मजल मारली आहे. या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यासाठी  गावकऱ्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह निर्माण झाला आहे.

मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, 'जाऊ बाई गावातचे' हे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी करत आहे. सीझनच्या विजेत्याचा मुकुट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे. या अंतिम भागात स्पर्धकांच्या आता पर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे. तर खास पाहुणे बनून येणार आहेत सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर, त्यांचा सोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर. सोनालीचा दिलेला मजेशीर टास्क स्पर्धक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा असणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/