प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जन्नत झुबेर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजल खान म्हणजेच मिस्टर फैजू हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. जरी दोघांनही त्यांच्या नात्याला अधिकृतपणे कोणतेही नाव दिले नव्हते. पण दोघेही अनेकदा एकत्र दिसले. कलर्स टीव्हीवरील लाफ्टर शेफ या कुकिंग रिॲलिटी शोच्या पत्रकार परिषदेत जन्नतने फैजूला तिचा भाऊ म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता आणि ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं तिनं सांगितलं होतं. पण चाहत्यांच्या या आवडत्या जोडीचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे.


फैजूला अनफॉलो केल्यानंतर, जन्नतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की आपण जे आहे ते स्वीकारले पाहिजे, जे घडले आहे ते सोडून दिले पाहिजे आणि पुढे जे होईल त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना या कपलचे ब्रेकअप झाले असल्याचे वाटत आहे.

जन्नतच्या या पोस्टखाली चाहते तिला फैजूसोबतच्या तिच्या नात्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. काही सोशल मीडिया युजर्स जन्नत आणि फैजू यांना एकमेकांशी बोलण्याचा सल्ला देत आहेत. संभाषणामुळे त्यांची समस्या सुटेल. तर काही चाहते याला फक्त एक पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. त्यांना असे वाटतं की कदाचित दोघांनीही काही ब्रँड किंवा प्रमोशनमुळे एकमेकांना अनफॉलो केलं असेल. अलीकडेच, सेलिब्रिटी मास्टरशेफ होस्ट फराह खानने फैजूला गमतीने सांगितले की ती या वर्षी त्याचे लग्न करणार आहे.