Close

जान्हवी आणि खुशी कपूरने विकले मुंबईतील दोन फ्लॅट, वर्षाअंती कपूर बहिणींनी केली कोट्यवधींची डील ( Janhvi Kapoor-Khushi Kapoor Sell Their 4 Flats In Mumbai’s Andheri)

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या दोन्ही मुली आज यशस्वी अभिनेत्री बनल्या आहेत. जान्हवीने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे, तर खुशी कपूरने नुकतीच सुरुवात केली आहे. अलीकडे खुशीचा आर्चीज रिलीज झाली आहे ज्याद्वारे सुहाना खान आणि अगस्त्य नंदा सारख्या अनेक स्टार किड्सने डेब्यू केले आहे.

सध्या या दोन्ही कपूर बहिणी त्यांच्या चित्रपटांसाठी नाही तर त्यांच्या करोडोंच्या प्रॉपर्टी डील्समुळे चर्चेत आहेत. जान्हवी-खुशीने त्यांचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत मुंबईतील 4 फ्लॅट विकले आहेत. हे चार फ्लॅट मुंबईतील अंधेरी भागात होते.

अंधेरीच्या ग्रीन एकर्स भागात असलेल्या या फ्लॅट्सचा सौदा कोटी रुपयांचा होता. रिपोर्ट्सनुसार, हे चार फ्लॅट 12 कोटींहून अधिक रुपयांना विकले गेले. दोन फ्लॅट प्रत्येकी 6 कोटी रुपयांना आणि उर्वरित दोन फ्लॅट 6.02 कोटी रुपयांना विकले गेले.

यापैकी 1870 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेले दोन फ्लॅट सिद्धार्थ नारायण आणि अंजू नारायण यांनी विकत घेतले आणि उर्वरित दोन फ्लॅट चित्रपट निर्माता आणि त्यांची मुलगी मुस्कान बहिरवानी आणि ललित बहिरवानी यांनी विकत घेतले, ज्यांचे क्षेत्रफळ 1614 स्क्वेअर फूट होते. हे सर्व फ्लॅट अनेक सुविधांनी सुसज्ज होते. यात पार्किंग एरिया आणि स्विमिंग पूल देखील आहे.

गेल्या वर्षी, खुशी कपूरने मुंबईतील वांद्रे येथे 65 कोटी रुपयांचा एक नवीन डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता, जो 8669 स्क्वेअर फूट आहे. त्यात एक मोठी बाग, स्विमिंग पूल आणि पाच पार्किंग लॉटचा समावेश आहे.

जान्हवी 'देवरा' या तेलगू चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ज्युनियर एनटीआर आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/