Close

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ येणार ११ एप्रिलला आकर्षक पोस्टर प्रदर्शित! (‘Institute of Pathology’ to come on April 11! Attractive poster unveiled)

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पावटॉलॉजी' म्हणजे नेमके आहे तरी काय? असा प्रश्न चित्रपटाच्या शीर्षकावरून पडणे साहाजिकच आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. ११ एप्रिल रोजी 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'च्या कुतूहल वाढविणाऱ्या नवीन पोस्टरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या आगामी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. विजय नारायण गवंडे, श्रीकांत देसाई या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शनाची धुरा प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी या दिग्दर्शक जोडगोळीने सांभाळली आहे. या दिग्दर्शकद्वयींचे चित्रपट यापूर्वी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवले गेले असून, चित्रपट महोत्सवांमधील जाणकार प्रेक्षकांनी यांच्या कामाचे कौतुक केले आहे. याच कारणामुळे 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या त्यांच्या आगामी चित्रपटात नेमके काय पाहायला मिळेल याची उत्कंठा आहे. नुकतेच पुण्यामध्ये चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच करण्यात आले. याप्रसंगी सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, पार्थ भालेराव, अपूर्वा चौधरी, देवेंद्र गायकवाड, दीप्ती देवी, हरीश थोरात, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी, प्रस्तुतकर्ते हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर, निर्मात्या नेहा गुप्ता, सहनिर्माते विजय गवंडे, श्रीकांत देसाई आदी मंडळी उपस्थित होती.

मराठी-हिंदी सिनेसृष्टीसोबतच दक्षिणेमध्येही प्रचंड मोठा चाहतावर्ग असलेले सयाजी शिंदे आणि मराठी रंगभूमीपासून हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजपर्यंत सगळीकडेच लोकप्रिय असलेले गिरीश कुलकर्णी या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकणी हे दोन दिग्गज अभिनेते प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. नाविन्यपूर्ण विषय, कॉलेजमधील धमाल-मस्ती सोबतच शिक्षणाचे महत्त्व सांगणारा आशय, सुमधुर संगीत, आशयघन कथानक, मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा दमदार अभिनय, सुरेख सादरीकरण, दर्जेदार निर्मितीमुल्ये अशी या चित्रपटाची विविध वैशिष्ट्ये आहेत.

चित्रपटाची कथा संतोष शिंत्रे यांनी लिहिली असून, दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद आणि गीतलेखनाची जबाबदारीही प्रसाद नामजोशी यांनी सांभाळली आहे. संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी या चित्रपटातील गीतांना सुमधुर संगीत दिले असून, मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी आरेखन केले आहे. दिग्दर्शनासोबतच सागर वंजारी यांनी कार्यकारी निर्मात्याचे काम चोख बजावत संकलनही केले आहे. गिरीश जांभळीकर यांनी छायांकन केले आहे. रश्मी रोडे यांनी वेशभूषा तर श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली आहे. कला दिग्दर्शन निलेश गोरक्षे यांचे असून, अमिन काझी यांनी व्हीएफएक्स केले आहेत. निर्मितीव्यवस्था प्रशांत गाडे आणि सुमित कुलकर्णी यांची आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/