अथिया शेट्टी आणि टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल सोमवारी २४ मार्चला पालक बनले. या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट आणि स्टोरी शेअर केली आणि सांगितले की तिने एका मुलीला जन्म दिला आहे.

अथिया शेट्टीने शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. राहुल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते - 'आमचा सुंदर आशीर्वाद लवकरच येत आहे, २०२५'. या घोषणेतील योगायोग असा होता की राहुलचे लग्न देखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी झाले होते आणि त्याने ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी त्याच्या पहिल्या मुलीच्या जन्माची आनंदाची बातमीही जाहीर केली.
अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, कियारा अडवाणी आणि अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी अथिया आणि केएल राहुल यांना पालक झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.



अलिकडेच तिने तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

२३ जानेवारी २०२३ रोजी अथिया शेट्टीने क्रिकेटर के.एल. राहुलशी शी लग्न केले. लग्नापूर्वी दोघेही सुमारे ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरो' चित्रपटातून सूरज पंचोलीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तथापि, हा चित्रपट काही खास कामगिरी करू शकला नाही. यानंतर, अथिया मुबारकां, मोतीचूर चकनाचूर सारख्या काही चित्रपटांमध्ये दिसली आहे. लग्नानंतर अथियाने अद्याप कोणताही नवीन चित्रपट साइन केलेला नाही.