आता लवकरच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतील. सुट्टीत मौजमस्ती करण्याकडे मुलांचा कल असतो. त्यापैकी एक म्हणजे पार्टी करणे. मोठ्यांचे अनुकरण करत मुले आपल्या मित्रमैत्रिणीसाठी पार्टी ठरवतात. अन् आयाना या पार्टीसाठी पदार्थ बनविण्याची तयारी करावी लागते. तेव्हा या पार्टीतील स्नॅक्स मजेदार, चविष्ट तरीही आरोग्यकारक बनविण्यासाठी नर्चेर हेल्थ सोल्युशन्सच्या संस्थापिका आणि सफोला नुट्रशंच्या आहारतज्ज्ञ शेरील सालीस यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.
मिठाई न देता गोड पदार्थ बनवा
मुलांना साखरेचा खाऊ आवडतो. परंतू अधिक आरोग्यदायक पर्याय आणि नैसर्गिक साखर असलेले पदार्थ अधिक पौष्टीक बनतात. उदा. कुकीज म्हणजे बिस्किटे बनवताना साखरेचे प्रमाण १/३ किंवा अर्ध्यापर्यंत कमी करा.
किंवा साखरेचा पर्याय म्हणून मध, खजूर पेस्ट अथवा गूळ यासारखे नैसर्गिक गोडवा देणारे पदार्थ वापरा. मफिंस आणि केकची मागणी मुले करतात. त्यात दालचिनी, केळ्याची प्यूरी आणि ॲपल सॉस यांचा वापर करू शकता.
न तळता खाद्यपदार्थ बनवा
तळलेले पदार्थ कसे टाळता येईल ते बघा. तुम्ही वापरत असलेल्या तेलाचा प्रकार आणि दर्जा याकडे अधिक लक्ष द्या. एकल बीज तेलाऐवजी मिश्रित तेल वापरा.
एअर फ्राईड म्हणजे हवेत तळलेले फिश फिंगरस् आणि रताळ्याचे काप व त्यासोबत हमस किंवा टोमॅटो सालसा या सारख्या रंगीबेरंगी व पौष्टिक डीपस देता येतील. वेगवेगळ्या भाज्यांचं टॉपिंग वापरून तुम्हीं मिनी पिझ्झा देखील बनवू शकता.
एक दल धान्यांचे मजेदार पदार्थ बनवा
पिझ्झा, सँडविचीस आणि पास्ता हे मुलांचे पार्टी मधील आवडते पदार्थ असतात. त्यामध्ये मैद्या ऐवजी भरड एक दल धान्ये वापरा. बेक्ड चिकन किंवा फिश कटलेटस् साठी रोल्ड ओट्स किंवा पिठीसाखर न घालता भरड एक दल धान्य ब्रेडींगसाठी वापरून अधिक आरोग्यदायक पदार्थ करून देता येतील.