आपले घर सुंदर असावे, आकर्षक सजावटीने परिपूर्ण असावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण घर सजावटीचा विचार केल्यावर अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे थोडेसे स्टायलिश आणि टिकाऊ सजावट करणे अवघड असेल का? तर यात अवघड असे काहीच नाही आणि तेच तुम्हाला सांगणार आहे. कधीकधी लहान सजावटीच्या वस्तू देखील आपल्या घराचे रुपडे पालटू शकतात. तुमचा पर्यावणानुकूल विचार आणि सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची स्मार्ट निवड करून तुमच्या घरात भव्य आणि शाश्वत अशी जागा तयार करू शकता. या छोट्या सजावटीच्या वस्तू घराला सुंदर तर बनवतातच शिवाय तुमचा मूडही रिफ्रेश करतात.
तुमच्या घरातील वातावरण फॅशनेबल पण तितकेच शाश्वत कार्यासाठी फक्त या पाच गोष्टींचा अवलंब करा. या संदर्भात नेस्टेरा होम डेकोरच्या उपाध्यक्ष व होम टेक्सटाइल्स आणि डिझाइन तज्ज्ञ स्मिता जोशी म्हणतात -
१. घरातील वनस्पती आणि नैसर्गिक घटकांचा समावेश करा
इनडोअर झाडे ही कोणत्याही जागेसाठी एक सुंदर जोड आहे, कारण त्यांचे सौंदर्य आणि आरोग्यदृष्ट्या असलेले फायदे, रंग आणि सुखद वातावरणनिर्मिती करण्याव्यतिरिक्त, ते हवेतील विषारी घटक शोषून घेतात आणि प्राणवायूची निर्मिती करून हवेची गुणवत्ता देखील वाढवतात. तुमची झाडे भरभराटीस येतील याची खात्री करण्यासाठी तुमच्या घरातील प्रकाशासह उत्तम प्रकारे काम करणाऱ्या कमी देखभाल करणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती निवडा. सक्युलन्ट प्लॅन्ट, स्नेक प्लँट्स आणि पॅथोस हे लोकप्रिय पर्याय आहेत कारण ते सर्व स्टायलिश आहेत आणि त्यांची देखभाल जास्त करावी लागत नाही.
२. घराला नवा साज देण्यासाठी टिकाऊ फॅब्रिक्स निवडा
पर्यावरणास अनुकूल सामग्री निवडल्याने तुमच्या घराच्या सजावटीवर मोठा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, पडदे खोलीचे स्वरूप आणि वातावरण लक्षणीयरीत्या बदलू शकतात. इको-फ्रेंडली, हलके वजनाचे पर्याय निवडा जसे की ब्रीझ एम्ब्रॉयडरी शीअर्स पडद्यासाठी आणि अपहोल्स्ट्री म्हणून वापरल्या जाणाऱ्या टिकाऊ फॅब्रिकसाठी सोफे आणि खुर्च्यांवर लेदरेट फॅब्रिक असलेल्या अर्बन हाइड्सचा समावेश करता येऊ शकेल. या गोष्टींमुळे केवळ तुमच्या घराचे सौंदर्य तर वाढतेच पण सोबतच नूतनीकरण न करता येणाऱ्या संसाधनांची गरज देखील कमी करते, ज्यामुळे पर्यावरणाला फायदा होतो.
३. संख्यात्मक नाही तर गुणात्मक गुंतवणूक करा
टिकाऊ वस्तूंचा वापर ही शाश्वत घराची रचना करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धतींपैकी एक आहे. या सर्व वस्तू दीर्घकाळ उपयोगात राहणे महत्वाचे आहे. कमी किमतीच्या, कमी-गुणवत्तेच्या वस्तू नेहमी विकत घेण्याऐवजी चांगले बनवलेले फर्निचर आणि सजावट निवडा, जे वर्षानुवर्षे टिकेल. हा दृष्टीकोन केवळ कचरा कमी करत नाही तर तुमचे घर अधिक काळासाठी ट्रेंडी आणि व्यावहारिक राहते याची खात्री देखील करते. गुणवत्ता आणि टिकाऊपणावर भर देऊन तुम्ही अधिक कालातीत आणि शाश्वत जीवनशैलीत योगदान देऊन उत्कृष्ट घरगुती वातावरण तयार करू शकता.
४. पुनर्वापर आणि हस्तकला सजावट
टिकाऊपणाचा विचार करतांना हस्तकला आणि रिसायकल सजावट तुमच्या घराला एक अनोखे सौंदर्य प्रदान करत असते. एखाद्या जुन्यापुराण्या पण कलात्मक फर्निचरला नवे रूप - नवा साज देता येऊ शकतो, छान असे वॉल आर्ट तयार होऊ शकेल, करणे, जुन्या कापडांपासून उशांचे अभ्रे किंवा वापरात नसलेल्या इमारती किंवा इतर लाकडाचा कलात्मक वापर करून आकर्षक शेल्फ् तयार करता येईल याचा विचार करा. या सर्व गोष्टी तुमच्या डिझाईनला पर्सनलाइझ टच देतात आणि तुम्हाला हव्याहव्याश्या सुंदर जागांची निर्मिती करतात. एक असे जग जे बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या तुलनेत हस्तनिर्मित वस्तू कारागिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
५. मिनीमलीझमचा स्विकार करा
मिनीमलीझमचा स्विकार करा. मिनीमलीझम म्हणजे कमी खर्च करणे नसून जे गरजेचे आहे त्याची खरेदी करणे. थोडक्यात जितकी गरज आहे त्याप्रमणे जगणे. त्यामुळे किमान सजावट शैलीच्या मदतीने घरात फॅशनेबल आणि तितकेच शांततापूर्ण वातावरण तयार केले जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड विभिन्न असते आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसते. त्याचप्रमाणे तुमचे घर हे तुमचा आत्मा आणि आठवणींचे एक छोटे प्रतिबिंब असते. त्यामुळेच, बहुउद्देशीय फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूंची निवड करा आणि एक तटस्थ रंगसंगती वापरा जी ॲक्सेसरीजसह सहज अद्ययावत केली जाऊ शकते.
तुम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक कसा निर्णय घेता, यावर फॅशनेबल आणि टिकाऊ घर बनवणे अवलंबून आहे आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. सावलीत, घरात, बाल्कनीत लावता येतील अशा इनडोअर झाडांचा समावेश, टिकाऊ अशा सुयोग्य वस्त्रांची निवड करून, दर्जेदार गुणवत्तेच्या फर्निचरमध्ये गुंतवणूक करून, हाताने बनवलेल्या आणि रिसायकल केलेल्या सजावटीच्या वस्तूंचा स्विकार करून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गरजे पुरतीच खरेदी किंवा खर्च करण्याची मानसिकता अवलंबली तर तुम्ही तुमच्या घराला पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली व आणखी सुंदर बनवू शकता. या छोट्या बदलांसह सुरुवात करा. तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा आणि तुमचे घरातील वातावरण अधिक शाश्वत आणि स्टायलिश कसे होईल याचा अनुभव घ्या.