आजच्या युगात केशरचना, केशभूषा यांना कमालीचे महत्त्व आले आहे. तरुणांपासून ते वृद्ध अशी सर्व मंडळी आपल्या हेअरस्टाईल बाबत जागरूक झाली आहेत. व्यक्तीमत्त्व खुलविणारी, चेहेऱ्याचे सौंदर्य वाढविणारी ही कला आहे. हेअरस्टाईल सोबतच केसांना रंगविण्याकडे तरुणांचा कल दिसून येतो.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-27-at-11.43.55_644027d5-800x600.jpg)
वयस्कर स्त्री - पुरुषांमध्ये तर केसांना कलप लावण्याची फॅशन प्रचलित झाली आहे. त्यामुळे जागोजागी हेअर सलून चांगली चालत आहेत. परिणामी या क्षेत्रातील व्यावसायिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र आपला विकास करण्यासाठी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्याचा ट्रेंड काय आहे, ते पाहून त्यांना आपली कलाकारी अप टू डेट ठेवावी लागत आहे.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-27-at-11.43.23_09e0a281-600x800.jpg)
या गोष्टींची निकड पाहून केशकर्तन, केशरचना आणि केस रंगविण्याची प्रात्यक्षिके दाखविणारा एक मेगा शो अलीकडेच मुंबईमध्ये झाला. त्यात स्पेकट्रम कलेक्शनचे अनावरण देखील करण्यात आले. स्ट्रीक्स प्रोफेशनल या हेअर केअर क्षेत्रातील कम्पनीतर्फे झालेल्या या कार्यक्रमात अनुभवी कलाकारांनी सलोनीस्ट, ब्युटी प्रोफेशनलिस्टना प्रात्यक्षिके दाखविली.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-27-at-11.44.34_56b0091e-600x800.jpg)
या प्रात्यक्षिकांमध्ये आधुनिक तंत्राच्या साहाय्याने उत्तम केशरचना कशा करायच्या याबाबत कारागीरांना सक्षम करण्यात आले.
केशरचनेच्या क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधी पाहता सर्जनशील तरुणाईने या क्षेत्रात करिअर करायला हरकत नाही.