Close

डिलीव्हरी नंतर किती दिवसांनी सेक्स करावा? (How many days after delivery should you have sex?)

Q. डिलीव्हरी नंतर किती दिवसांनी सेक्स करावा?
मी एक महिन्यापूर्वी बाळंत झाले आहे. माझे पती मात्र सेक्स करण्याबाबत फार उतावीळ झाले आहेत. त्यांना धीर धरवत नाही. मी त्यांना अजून महिनाभर थांबण्यास सांगते आहे. पण ते ऐकत नाहीत. बाळंतपणानंतर किती दिवसांनी सेक्स करायला हवा, त्याचे मार्गदर्शन करा. म्हणजे मला पतीला तसे सांगता येईल?

  • भक्ती, अंबरनाथ
    A. सर्वसाधारणपणे बाळंतपणानंतर कमीत कमी एक महिना तरी सेक्स संबंध ठेवू नयेत. तुमची डिलीव्हरी जर सामान्यरित्या झाली असेल तर महिनाभरानंतर तुम्ही सेक्स करु शकता. मात्र जर डिलीव्हरी दरम्यान काही समस्या निर्माण झाली असेल किंवा सिझेरियन करून डिलीव्हरी झाली असेल, तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार वागा. समजा संबंध ठेवल्यावर काही दुखलं खुपलं तर गायनॅकॉलॉजिस्टचा सल्ला घ्यायला विसरू नका.
  • Q. कामक्रीडा पूर्ण करुन झाल्यावर प्रणयचेष्टा (फोर प्ले) करणे योग्य आहे का? माझे पती करत असतात.
  • रजनी, अहमदनगर
    A. कामक्रीडा झाल्यानंतर प्रणयचेष्टा (फोर प्ले) करण्याची प्रवृत्ती आपल्यासकडे सहसा आढळून येत नाही. मात्र काही स्त्रिया, मआपलं काम झाल्यावर, कूस बदलून हे झोपी जातातफ अशी पतीबद्दल तक्रार करत असतात. याचा अर्थ स्त्रीला किंवा पुरुषाला फोर प्ले हवा असतो. प्रत्यक्ष कामक्रीडा करताना जो आवेग असतो, तो सुख गाठल्यावर देखील कमी होत नसतो. त्याचा फायदा उठवत फोर प्ले करणे गरजेचे असते. त्यातही वेगळे समाधान मिळते.
  • Q. माझे नुकतेच लग्न झाले आहे. फॅमिली प्लॅनिंग करायचे ठरविल्याने मी सेक्स करताना कंडोम वापरतो. परंतु आता मला त्यात समाधान वाटत नाही. माझ्या पत्नीच्या पण अशाच भावना आहेत. याला काही पर्याय आहे का?
  • सतीश, पुणे
    A. ही केवळ तुमच्या एकट्याचीच समस्या नाही. बर्‍याच पुरुषांची कंडोम वापराबाबत अशीच तक्रार ऐेकायला मिळते. यावर तोडगा म्हणजे एकतर महिलांचे कंडोम मिळते, ते वापरून पाहा. अन्यथा तुमच्या पत्नीला गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सांगा. त्या केमिस्टकडे सहज उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा वापर आपल्या डॉक्टरांना विचारून करा. अन् पत्नीची सहमती असेल तरच उपयोग करा.

Share this article