Close

महाकुंभच्या चेंगराचेंगरी दरम्यान अभिनेत्री हेमा मालिनी झाल्या अमृतस्नानात सहभागी (Hema Malini Took A Bath During The Mahakumbh Stampede)

२८-२९ जानेवारीच्या मध्यरात्री महाकुंभात चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये आतापर्यंत २० भाविकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. दरम्यान, अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी या प्रयागस्थानी स्नान करण्यासाठी गेल्या. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर हेमा मालिनी यांनी अमृत स्नान केले.

हेमा मालिनी यांनी बुधवारी सकाळी संगमात स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबत योगगुरू बाबा रामदेव आणि जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराजही उपस्थित होते.

अमृतस्नान घेतल्यानंतर हेमा मालिनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, महास्नानाच्या शुभ मुहूर्तावर मला येथे गुरू स्वामी श्री अवधेशानंदजींच्या सहवासात स्नान करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे, मला खूप चांगले वाटले. इतके कोटी लोक आले आहेत. मलाही इथे स्नानासाठी जागा मिळाली, धन्यवाद.

हेमा मालिनी यांचे फोटो प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा व्हीआयपी लोकांबद्दल जनतेमध्ये नाराजी आहे. व्हीआयपींना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीवर अनेक वापरकर्ते टीका करत आहेत. एका वापरकर्त्याने याला चेंगराचेंगरीशी जोडले आहे.

हेमा मालिनी यांच्या आधीही अनेक सेलिब्रिटी महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी आले होते. अनुपम खेर, अदा शर्मा, अविनाश तिवारी, रेमो डिसूझा, गुरु रंधावा यांनीही महाकुंभात स्नान केले आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/