Close

उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉलमुळे भारतात हृदयसंबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे ( Heart disease rates are increasing in India due to high LDL cholesterol)

भारतात परिस्थिती बदलत आहे, जेथे असंसर्गजन्य आजार प्राथमिक आरोग्‍य धोका म्‍हणून उदयास येत आहेत, तर संसर्गजन्य आजार अजूनही चिंतेचा विषय आहेत. या संकटाच्या अग्रस्‍थानी हृदयसंबंधित आजार आहेत. संशोधनांमधून निदर्शनास आले आहे की, भारतातील ७.८ टक्‍के मृत्यूंसाठी उच्‍च कोलेस्ट्रॉल कारणीभूत आहे. आरोग्यसेवा आणि सार्वजनिक आरोग्य प्रयत्‍नांमधील प्रगतीमुळे हृदयसंबंधित आजारांचे व्यवस्थापन करण्यास मदत झाली आहे, असे असले तरी जागरूकता वाढवल्याने या प्रयत्‍नांमध्ये आणखी सुधारणा होऊ शकते.

उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉल धोकादायक ठरू शकते
पाश्चिमात्‍य देशांच्‍या तुलनेत भारतीयांना १० ते १५ वर्षे अगोदर हृदयसंबंधित आजार होतात. हृदयसंबंधित आजारांचे मुख्‍य कारण म्‍हणजे उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉल (एलडीएलसी). एलडीएल कोलेस्‍ट्रॉल 'सायलेण्‍ट किलर' आहे, ज्‍यामध्‍ये लक्षणे दिसून येत नाहीत, हळूहळू रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये फॅट जमा होते. फॅट्सचे प्रमाण वाढत जाण्‍यासह रक्‍तप्रवाहाला अडथळा होऊ शकतो किंवा रक्‍तवाहिन्‍या फुटू शकतात, परिणामत: प्रकृती गंभीर होऊ शकते.

एलडीएलसी हा कोलेस्‍ट्रॉलचा प्रकार आहे, जो शरीराच्या विविध पेशींमध्ये फॅट्स वाहून नेण्यासाठी जबाबदार असतो. पण, एलडीएलसीची पातळी वाढते तेव्हा तो सर्वात धोकादायक कोलेस्‍ट्रॉल असतो, याच कारणामुळे हा 'बॅड कोलेस्‍ट्रॉल' म्हणून ओळखला जातो. एलडीएलसीची पातळी नियंत्रित ठेवली पाहिजे, त्यांचे प्रमाण वाढणार नाही किंवा कमी होणार नाही याची खात्री करून घेतली पाहिजे आणि संतुलन राखले पाहिजे.

एलडीएल कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापनासाठी वैयक्तिकृत लक्ष्‍य
एलडीएल कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळात त्‍यांची चाचणी करणे आवश्‍यक आहे. कार्डियोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) वयाच्‍या १८ वर्षांपासून लिपिड प्रोफाइल तपासणीची शिफारस करते. लवकर तपासणीमुळे समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्‍यांचे निदान होण्‍यास मदत होते. आरोग्‍यदायी दिसणाऱ्या व्‍यक्‍तींमध्ये देखील एलडीएलसीचे प्रमाण जास्त असू शकते, म्हणून नियमित चाचणी करणे महत्त्वाचे आहे.

मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. झाकिया खान म्‍हणाल्‍या , ''एलडीएल कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन करणे म्हणजे केवळ लक्ष्यित संख्या गाठणे एवढेच नाही. प्रत्येक व्यक्‍तीचे वेगळे जोखीम घटक असतात, ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा कौटुंबिक इतिहास, जीवनशैली निवडी, लठ्ठपणासारख्या पूर्व-अस्तित्वातील स्थिती इत्यादींचा समावेश असतो. हे घटक कोलेस्ट्रॉल लक्ष्यांवर आणि उपचार पद्धतींवर प्रभाव पाडतात, ज्यामुळे वैयक्तिक व्यवस्थापन आवश्यक असते. नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या कालांतराने नकळतपणे वाढतात. लवकर हस्तक्षेप केल्याने प्लाक जमा होणे किंवा रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये अडथळा येणे यांसारख्या गुंतागूंत टाळता येतात. निर्धारित उपचार आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन केल्याने दीर्घकालीन संरक्षण मिळते. माझे १०-१५ टक्‍के रुग्ण त्यांच्या उपचारांचे काटेकोरपणे पालन करतात आणि वेळेवर स्‍वत:ची तपासणी करतात. आज कोलेस्ट्रॉल पातळीकडे दुर्लक्ष केल्याने अपरिवर्तनीय परिणाम होऊ शकतात. जीवनशैलीतील बदल आणि वैद्यकीय मार्गदर्शनासह नियमित चाचणी हा हृदयाचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.''

भारतीयांना जास्त धोका आहे का?
भारतीयांना जास्त धोका आहे, कारण त्यांच्यामध्‍ये लहान, दाट एलडीएल कण असतात. मोठ्या एलडीएल कणांपेक्षा वेगळे हे लहान कण सहजपणे रक्‍तवाहिन्‍यांच्‍या भित्तिकेमध्‍ये प्रवेश करू शकतात, जेथे ते ऑक्सिडेशनमधून जातात आणि सूज (जळजळ) निर्माण करतात. यामुळे फॅट्स जमा होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हृदयसंबधित आजार, स्ट्रोक आणि हार्ट फेलुअरचा धोका वाढतो.

तुमच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍याची काळजी घ्‍या
सक्रिय जीवनशैली आणि आरोग्‍यदायी आहार सेवन करणे महत्त्वाचे असले तरी काही केसेसमध्‍ये उच्‍च एलडीएलसी पातळ्या व्यवस्थापित करण्यासाठी केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसे नसते. उच्‍च एलडीएलसी असलेल्या व्यक्तींसाठी, औषधोपचार अनेकदा आवश्यक असतो. रुग्णांनी डॉक्टरांकडे जाणे, निर्धारित उपचारांचे पालन करणे आणि लक्ष्ये पूर्ण झाल्यावरही प्रिस्क्रिप्शनचे पालन करणे महत्वाचे आहे. लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की एलडीएलसीवरील उपचार आजीवन कटिबद्धता आहे, अल्‍पकालीन लक्ष्‍य नाही.

लक्षात ठेवा, एलडीएलसी नियंत्रणात ठेवणे ही आयुष्यभराची कटिबद्धता आहे. नियमित कोलेस्‍ट्रॉल तपासणी, वेळेवर औषधे घेणे आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करणे हे हृदयसंबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आणि आरोग्‍यदायी भविष्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे!

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/