रणबीर कपूरच्या आगामी रामायण चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या रामायणात कलाकारांच्या निवडीपासून ते संगीतकारापर्यंत सर्वच खास असणार आहे. या चित्रपटातील गाण्यांसाठी हॉलिवूडचे संगीतकार हॅन्स झिमर यांचे योगदान लाभणार असल्याचेही म्हटले जात आहे.
सध्या चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियावर रणबीर कपूरच्या 'रामायण'ची चर्चा जोरात सुरू आहे. नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाची स्टारकास्ट, व्हीएफएक्स, सादरीकरणाचा अँगल सगळं काही वेगळं असणार आहे.
'रामायण' हा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरून एक छायाचित्र समोर आले होते, ज्यामध्ये 'रामायण'चे शूटिंग सुरू झाल्याचा इशारा देण्यात आला होता. चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारण्यासाठी काहींची नावे फायनल करण्यात आली आहेत, तर काहींची नावे अद्याप मीडियात येणे बाकी आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक रोमांचक आणि मोठी माहिती समोर आली आहे.
'रामायण'चे संगीत
‘रामायण’ या भक्तिमय चित्रपटातील गाण्यांवर सविस्तरपणे काम केले जाणार आहे. प्रत्येक गोष्ट पूर्णपणे वेगळी आणि दीर्घकाळ संस्मरणीय करण्यासाठी ऑस्कर विजेते ए आर रहमान आणि हंस झिमर 'रामायण' मधील गाण्यांना संगीत देणार आहेत.
हॅन्स झिमर कोण आहे?
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2024/04/ram.jpg)
एआर रहमान हे नाव आपल्या परिचयाचं आहे. 'स्लमडॉग मिलेनियर'साठी दोन ऑस्कर जिंकणाऱ्या एआर रहमानला कुठल्याही ओळखीची गरज नाही. हॅन्स झिमर हा देखील ऑस्कर विजेता असून त्याचे काम आणि नाव दोन्ही हॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहेत.
हॅन्स झिमर हा जर्मन फिल्म स्कोर कंपोजर आणि म्यूजिक प्रोड्यूसर आहे. 'द लायन किंग', 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन', 'इनसेप्शन', 'डून' अशा काही हिट चित्रपटांचे साउंडट्रॅक त्यांनी दिले आहेत. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला लिओनार्डो डिकॅप्रियो, जॉनी डेप, 'मिस्टर बीन' अभिनेता रोवन ॲटकिन्सन यांसारख्या हॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या चित्रपटांना हॅन्सने अप्रतिम संगीत दिले आहे. आता हॅन्स 'रामायण'साठीही संगीत देणार आहे.
या चित्रपटांसाठी ऑस्कर जिंकले
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2024/04/jac-jhimar.jpg)
हॅन्स झिमर यांना आतापर्यंत १२ चित्रपटांसाठी ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी दोन चित्रपटांसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हॅन्स झिमरने १९९५ मध्ये रिलीज झालेल्या 'द लायन किंग' आणि २०२२ मध्ये 'डून'साठी ऑस्कर जिंकले आहेत.
'रामायण'मधून पदार्पण करणार
एआर रहमानचा मुलगा एआर अमीन याने इन्स्टाग्रामवर पुष्टी केली आहे की हे दोन ऑस्कर विजेते संगीतकार रामायण चित्रपटासाठी संगीत देणार आहेत. या प्रोजेक्टद्वारे हॅन्स झिमर हे संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
(हॅन्स झिमर आणि रणबीर कपूर. फोटो क्रेडिट- एक्स प्लॅटफॉर्म)