Close

रमझानदरम्‍यान मधुमेहाचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी मार्गदर्शन (Guidance for Effectively Managing Diabetes During Ramadan)

रोजा व नमाज आणि सामुदायिक बंधनाचा महिना रमझान जवळ आला आहे. अनेकजण हा महिनाभर उपवास करतात आणि रोजा व नमाजचे पालन करतात. पण मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी या पवित्र महिन्‍यादरम्‍यान अधिक काळजी घेण्‍याची आणि नियोजन करण्‍याची गरज आहे. योग्‍य माहितीसह ते त्‍यांचा उपवास कार्यक्षमपणे पार पाडू शकतात आणि त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत चिंता न करता या पवित्र महिन्‍याच्‍या रोजामध्‍ये सहभाग घेऊ शकतात.

पहाटेपूर्वीच्‍या सुहूरपासून सूर्यास्‍तनंतरच्‍या इफ्तारपर्यंत उपवासादरम्‍यान रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या संतुलित राखणे संभाव्‍य चढ-उतारांमुळे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. म्‍हणून, सुहूर व इफ्तार महत्त्वपूर्ण भोजन असले तरी त्‍यामधून ऊर्जा व पोषण मिळणे आवश्‍यक आहे. मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी या काळात रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांमधील मोठ्या परिवर्तनांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी काळजीपूर्वक आहाराचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

योग्‍य पौष्टिक आहाराव्‍यतिरिक्‍त रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍याची देखील शिफारस केली जाते. कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर रिअल-टाइम देखरेख ठेवण्‍यासाठी सोईस्‍कर व वेदना-मुक्‍त मार्ग आहे. संतुलित आहाराचे सेवन व नियमितपणे ग्‍लुकोज मॉनिटरिंगसह मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍ती सुरक्षितपणे उपवास करू शकतात आणि या पवित्र महिन्‍यादरम्‍यान त्‍यांचे आरोग्‍य उत्तम ठेवू शकतात.

सध्‍या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे डीआरएनबी एण्‍डोक्रिनोलॉजी करत असलेले एमबीबीएस, डीएनबी (जनरल मेडिसीन) डॉ. प्रथमेश देवरूखकर म्‍हणाले, ''कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) रमजानदरम्‍यान उपवास करणाऱ्या मधुमेही व्‍यक्‍तींसाठी महत्‍वपूर्ण आहे. सीजीएम देणारा रिअल-टाइम ब्‍लड शुगर डेटा उपवासापूर्वी व उपवासानंतर आहारामुळे ग्‍लुकोजमधील चढ-उतार ओळखण्‍यास आणि त्‍याचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत करतो. हा डेटा-संचालित दृष्टिकोन आहाराचे प्रमाण, आहाराची वेळ आणि व्‍यायामाचे समायोजन करण्‍यास मदत करतो, ज्‍यामुळे रक्‍तातील शर्करेवर उत्तम नियंत्रण राहते आणि आत्‍मविश्‍वास येतो.''

यंदा रमझानदरम्‍यान मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी खाली काही टिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत:

  1. नियमितपणे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची तपासणी करा: विशेषत: रमझानदरम्यान मधुमेहाच्‍या योग्‍य व्‍यवस्‍थापनासाठी नियमितपणे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची तपासणी करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. फ्री स्‍टाइल लिब्रे सारखे कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉन्टिरिंग डिवाईसेस रिअल-टाइम डेटा देतात, तसेच सिंगल-टाइम रिडिंग्‍ज ऐवजी ब्‍लड शुगर ट्रेण्‍ड्सचे परिपूर्ण दृश्‍य देतात. हा डेटा सहजपणे स्‍मार्टफोनवर देखील उपलब्‍ध होतो, ज्‍यामुळे आहार, शारीरिक व्‍यायाम व उपचारासंदर्भात निर्णय घेणे सोपे होऊ शकते.
  2. इफ्तारदरम्‍यान शरीराला उत्तम पोषण द्या: प्रथेनुसार खजूर व फळांचे सेवन करत उपवास सोडला जातो, ज्‍यानंतर पौष्टिक व संतुलित आहाराचे सेवन केले जाते. भरपूर पाणी पित स्‍वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे आणि उच्‍च कॅफिन असलेले किंवा साखरयुक्‍त पेये जसे कॉफी, चहा व शीतपेये पिणे टाळा. कर्बोदके, प्रथिने व फॅट्सचे योग्‍य संतुलन असलेला संतुलित आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. ओट्स, मल्टीग्रेन ब्रेड, भाज्या आणि मसूर (डाळ) यांसारख्‍या पिष्‍टमय पदार्थांचे, तसेच प्रथिनांचे स्रोत असलेले मासे, टोफू आणि काजू यांचे सेवन करा, ज्‍यामुळे उर्जेची पातळी आणि एकूण आरोग्य उत्तम राहिल.
  3. शारीरिक व्‍यायाम महत्त्वाचा: विशेषत: रमझानदरम्‍यान मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी शारीरिक व्‍यायाम योग्‍य पोषणाइतकाच महत्त्वाचा आहे. उपवासादरम्‍यान विशेषत: उपवास सोडण्‍याच्‍या शेवटच्‍या काही तासांदरम्‍यान अतिप्रमाणात व्‍यायाम करणे टाळा. त्‍याऐवजी, फिटनेस राखण्‍यासाठी आणि रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी जवळपास ३० मिनिटांसाठी चालणे किंवा योग करणे यांसारखा हलक्‍या स्‍वरूपाचा व्‍यायाम करा.
  4. झोपेच्‍या वेळापत्रकामध्‍ये सुधारणा करा: रमझानदरम्‍यान अनेकदा मित्र व कुटुंबियांसोबत रात्री उशिरापर्यंत वेळ व्‍यतित केला जातो. पण, आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी पुरेशी व योग्‍य प्रमाणात झोप घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे झोप कमी होण्‍याच्‍या प्रमाणाला देखील प्रतिबंध होण्‍यास मदत होते, ज्‍याचा भूकेवर नकारात्‍मक परिणाम होऊ शकतो. तसेच रोगप्रतिकारशक्‍ती, चयापचयाला साह्य करण्‍यासाठी आणि रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे नियमन करण्‍यासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते, ज्‍यामुळे मधुमेहाच्‍या व्‍यवस्‍थापनामध्‍ये पुरेशी झोप मिळणे आवश्‍यक आहे.

नियोजन करत, आरोग्‍यदायी आहार निवडी करत आणि आरोग्‍याची काळजी घेत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकते आणि यंदा रमझानचा आनंद घेता येऊ शकतो.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/