Close

विज्ञानातील गमतीचा अभ्यासपूर्ण अनुभव देणाऱ्या संग्रहालयाचे उद्घाटन (Globally Popular Paradox Museum Inaugurated In Mumbai)

कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि दृष्टी भ्रमाचा वापर करून तयार करण्यात आलेले पॅराडॉक्स संग्रहालयाचे उद्घाटन काल घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. ग्रीसमध्ये स्थापन झालेले व परदेशात लंडन, पॅरिस, शांघाय, बर्लीन अशा अनेक ठिकाणी पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या अनोख्या म्युझियमचे उद्घाटन संस्थापक मिलटोस काम्बोरिडस्‌ व संचालक हॅरिस डौरोस यांच्या हस्ते झाले.

“या संग्रहालयात विज्ञानातील गमतीचा अभ्यासपूर्ण अनुभव कलाप्रेमींना घेता येणार आहे. कलेचा आणि विज्ञानाचा संगम असलेल्या या संग्रहालयात विद्यार्थ्यांना रोमांचित सफर अनुभवता येईल,” असे मिलटोस यांनी सांगितले.

भ्रम आणि विरोधाभास यांचा समतोल साधून तयार करण्यात आलेल्या या संग्रहालयात ५० पेक्षा अधिक प्रयोग आणि १५  खोल्यांचा समावेश आहे. आरशांचा गोंधळ, विविध रंगाच्या रोषणाईने बदलणारे भाव, इन्फिनिटी विहीर, एकाच खोलीत जाणवणारा उंचीचा फरक असे अनेक गमतीशीर प्रयोग यात अनुभवता येतील.

Share this article