मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रसाद-अमृता, मुग्धा-प्रथमेश, सुरुची-पियुष या सेलिब्रिटी जोड्यांपाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. छोट्या पडद्यावरील मालिका ‘माझा होशील ना’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. याशिवाय ती अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे.
सध्या गौतमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गौतमीने जोडीदाराबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी देशपांडे अभिनेता-इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोघांनीही इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. आज त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला.
गौतमीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केलेत. गौतमीने हे फोटो शेअर करताना लिहिलंय की, माझ्या सिक्रेट सांताचं आगमन थोडं लवकर झालंय. खुप आनंद आणि प्रेम असं कॅप्शन देत गौतमीने ही खास बातमी शेअर केलीय.
गौतमी देशपांडे तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकर सोबत लग्न करणार आहे. स्वानंद हा एक इनफ्लुएन्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे. स्वानंद भाडिपा या प्रसिद्ध युट्यूब चॅनलमध्ये सक्रिय आहे. स्वानंद एक डिजीटल क्रिएटर असून त्याचे अनेक रिल्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. गौतमी - स्वानंदच्या चाहत्यांनी त्यांचं कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलंय.