प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आणि शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांनी दादर पश्चिम येथील त्यांचा एक फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट ज्या किंमतीमध्ये विकला गेला ती किंमत ऐकून धक्काच बसेल.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याचे कुटुंबीय देखील सतत चर्चेत असतात. नुकताच शाहरुखची पत्नी प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर गौरी खानने मुंबईतील दादर पश्चिम परिसरातील एक आलिशान अपार्टमेंट विकले आहे. २०२२ मध्ये तिने हे आपर्टमेंट खरेदी केले होते. गौरीने आता हा फ्लॅट विकला तेव्हा तिला चांगला नफा झाला आहे.

गौरी खानने तिचा हा फ्लॅट ११.६१ कोटी रुपयांना विकला आहे. तिने २०२२ मध्ये हा फ्लॅट ८ कोटी रुपयांना घेतला होता. म्हणजे गौरीला आता या फ्लॅटमुळे जवळपास ३ ते ३.५० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक (IGR) च्या वेबसाइटवर उपलब्ध मालमत्ता नोंदणी दस्तऐवजानुसार, मालमत्तेचा व्यवहार अधिकृतपणे मार्च २०२५ मध्ये नोंदणीकृत झाला होता.
दादर पश्चिम हे मुंबईतील एक असे ठिकाण आहे जे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीसाठी ओळखले जाते. हे पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्ग तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांजवळ आहे. हा परिसर शिवाजी पार्क, प्रभादेवी, माटुंगा आणि वरळी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांजवळ आहे. त्यामुळे ते राहण्यासाठी उत्तम ठिकाण बनले आहे.

गौरी खानने विकलेले अपार्टमेंट कोहिनूर अल्टिसिमो बिल्डिंगमध्ये आहे. हा फ्लॅट कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेल्या रेडी-टू-मूव्ह-इन निवासी प्रकल्पाचा भाग आहे. प्रकल्पामध्ये 2.5 BHK, 3 BHK आणि 3.5 BHK फ्लॅट्स तयार करण्यात आले होते. गौरीच्या अपार्टमेंटचा 184.42 चौरस मीटर (अंदाजे 1,985 चौरस फूट) बिल्ट-अप एरिया आहे, ज्यामध्ये 1,803.94 स्क्वेअर फूट (अंदाजे 167.55 स्क्वेअर मीटर) कार्पेट एरिया समाविष्ट आहे. डीलमध्ये दोन कार पार्किंग स्पेसचाही समावेश आहे.
या फ्लॅटच्या विक्री किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. गौरीने तीन वर्षांपूर्वी साडेआठ कोटी रुपयांना विकत घेतला होता. आता हा फ्लॅट विकून गौरीला 37% नफा झाला आहे. तिने हा फ्लॅट ११.६१ कोटी रुपयांना विकला आहे.