Close

फ्रूट क्रीमयुक्त संत्र्याचे आईस्क्रीम व फणसाचे आईस्क्रीम (Fruit Creamy Orange Ice Cream And Jackfruit Ice Cream)

फ्रूट क्रीमयुक्त संत्र्याचे आईस्क्रीम
साहित्यः 6 संत्री, दिड पेला क्रीम, 1 मोठा चमचा पिठीसाखर, 2 थेंब व्हॅनिला इसेन्स, 1 वाटी संमिश्र फळे, अर्ध्या लिंबाचा रस, 1 मोठा चमचा मध.
कृतीः संत्री सोलून ज्यूसरमधून संत्र्याचा रस काढून घ्या. अर्धा मोठा चमचा पिठीसाखर, मध व लिंबाचा रस मिसळून सेट होण्यासाठी वेगवेगळ्या ग्लासात ठेवा. क्रीममध्ये अर्धा चमचा पिठीसाखर व व्हॅनिला इसेन्स टाकून मिसळा. प्यायला देताना ग्लास फ्रिजरमधून बाहेर काढा. त्यावर क्रीमचे पफ ठेवा व फळांनी सजवून सर्व्ह करा.


फणसाचे आईस्क्रीम
साहित्यः 1 कप फणसाचा रस, 4 कप दूध, 1 कप दूध पावडर, 1 कप क्रीम, 4 टेबलस्पून साखर, 1 टिस्पून जिलेटीन.
कृतीः प्रथम दूध आटवून 2 कप करावे. फणसाच्या रसात जिलेटीन पावडर मिसळून एक-दोन मिनिटे गरम करावे. दूध व रस गार झाले की त्यात दूध पावडर व साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून सेट करावे. दोन तासाने त्यात क्रीम घालून परत फेटावे व सेट करावे. आवश्यक वाटल्यास दोन थेंब पिवळा रंग घालावा. फणसाला वास व रंग छान येतो.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/