Close

डागरहित, निरोगी त्वचेसाठी… (For Blemish-Free, Healthy Skin…)

त्वचा हा शरीराचा एक महत्त्वपूर्ण घटक. आपल्या सौंदर्यात त्वचेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्वचा जर डागरहित, निरोगी असेल तर सौंदर्य आपोआपच खुलतं.
ब्लॅक हेड्स, डोळ्यांखालील काळी वर्तुळे, रूक्ष त्वचा चेहर्‍याची चमक कमी करतात. या समस्यांचा सामना करण्यासाठी काही खास टिप्स्.


पिग्मेंटेशन
पिग्मेंटेशन ही स्त्रियांची मोठी समस्या आहे. याची अनेक कारणे आहेत. उदा. उन्हात जास्त फिरणे, हार्मोनल बिघाड-बदल, उच्च रक्त दाब इत्यादींवर दिली जाणारी औषधे, गर्भनिरोधक गोळ्या इत्यादी. तसेच व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते.
उपाय
उन्हात बाहेर जाण्यापूर्वी 20 मिनिटे आधी जास्त एसपीएफ असलेल्या सनस्क्रीम जरूर लावा.
चेहरा घसघसून पुसू नका. हलक्या हाताने स्वच्छ टॉवेलने चेहरा पुसा.
चेहरा स्वच्छ केल्यावर स्किन लायटनिंग क्रिम लावा.
समस्या अधिक काळ राहिल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घरगुती टिप्स
2 चमचे टॉमेटोचा रस त्यात 1 चमचा लिंबाचा रस मिसळून रोज चेहर्‍याला लावा.
2-2 चमचे लिंबाचा आणि काकडीचा रस एकत्र करून चेहर्‍याला लावा नि 20 मिनिटांनी चेहरा धुवा.
स्ट्रॉबेरी, कच्ची पपई यांचा गर काढून चेहर्‍याला लावा. त्याचबरोबर बटाट्याचा रस लावणे देखील फायदेशीर ठरेल.

डोळ्यांखालील वर्तुळे
अपुरी झोप, धावपळीची जीवनशैली, पोषक तत्त्वांची कमतरता किंवा हार्मोनल असंतुलन यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात. डोळ्यांच्या भोवतालची त्वचा अधिक नाजूक व संवेदनशील असल्याने त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
उपाय
डोळे जोरजोरात चोळू नका. त्यावर जास्त ताण येऊ नये, याची काळजी घ्या.
काम करताना ठराविक वेळाने, काही मिनिटे डोळ्यांना विश्रांती द्या.
रात्री झोपण्याआधी डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेला मॉइश्‍चरायजर लावा.
बाहेर पडताना सनस्क्रीम लोशन जरूर लावा.
डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सनग्लासेसचा वापर करा.
डोळ्यांच्या मेकअप काढताना मेकअप रिमूव्हरचा वापर करा.
घरगुती उपाय
पुदिन्याची पाने वाटून पेस्ट बनवा व काळे डाग असलेल्या ठिकाणी लावा.
बदाम रात्रभर भिजत घाला. सकाळी वाटून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला.
टॉमेटोच्या रसात थोडं बेसन आणि 2-3 थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण नियमित लावल्याने डार्क सर्कल्स् कमी होतील.

ब्लॅक हेड्स
तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. त्वचेतून स्रवणारे नैसर्गिक तेल एकत्रित जमा झाल्याने ब्लॅक किंवा व्हाईट हेड्स येतात. त्याचबरोबर हार्मोनल असंतुलन किंवा मेकअप व्यवस्थितरित्या न काढल्याने ही समस्या उद्भवते. हनुवठी, नाक, ओठांच्या आसपास ब्लॅक हेड्स अधिक दिसून येतात.
उपाय
रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या बोळ्यावर अस्ट्रिंजेंट घेऊन तो बोळा नाक आणि त्याच्या आसपासच्या भागावर फिरवून त्वचा स्वच्छ करा.
ऑइल फ्री मेकअप प्रॉडक्ट वापरा.
नियमित क्लीनअप केल्याने देखील ह्या समस्येपासून सुटका मिळेल.
घरगुती उपाय
ग्रीन अ‍ॅप्पलचा गर चेहर्‍यावर लावा आणि सुकल्यावर धुऊन टाका. ब्लॅक हेड्स निघून जातील.
कोथिंबीर वाटून त्यात हळद मिसळा व ही पेस्ट चेहर्‍याला लावा.
दालचिनी पावडरमध्ये थोडा लिंबाचा रस मिसळून ब्लॅक हेड्सच्या जागी लावा. ब्लॅक हेड्स कमी होण्यास मदत होईल.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/