फालुदा
साहित्य: 8 स्कूप्स वेनिला आईस्क्रीम, अर्धा कप रोझ सिरप, 2 टेबलस्पून सब्जा बी, 2 ते 3 कप थंड दूध, 2 टेबलस्पून ड्रायफ्रुट्स, छोटे तुकडे, 1 पॅकेट फालुदा शेवया, 1 कप स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली, 4 टेस्पून टूटी-फ्रुटीचे तुकडे, सजावटीसाठी चेरी.
कृतीः फालुदा बनवायच्या किमान 5 तास आधी जेली बनवून फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावी. जेली बनवण्यासाठी जेली पावडर आणून पाकीटावरील कृती वाचून जेली बनवावी. सब्जा बी फालुदा बनवण्याच्या किमान 2 ते 4 तास आधीच अर्धा कप पाण्यात भिजवून ठेवाव्यात. 1 लिटर पाणी उकळवावे त्यात फालुदाच्या शेवया घालून 4 ते 5 मिनिटे शिजवाव्यात. गरम पाणी काढून टाकावे व थंड पाणी घालून दुसर्या भांड्यात थंड पाण्यासकट ठेवून द्यावे. दूध आणि रोझ सिरप मिक्स करून घ्यावे. गोडपणा जर कमी वाटत असेल तर अजून थोडे रोझ सिरप घालावे. ढवळून तयार ठेवावे.
फालुदा बनवायच्या वेळेस 4 ग्लास घ्यावे. त्यात भिजवलेले सब्जा बी, जेली, शिजवलेल्या शेवया, आईस्क्रीमचा 1 स्कूप, दूध आणि परत त्यावर 1 स्कूप वेनिला आईस्क्रीम घालावे. ड्रायफ्रुट्स आणि चेरीने सजवावे. लगेच सर्व्ह करावे.
फालुदा (Fhaluda)
Link Copied