Close

उपवासाची थालीपीठ भाजणी (Fasting Thalipeeth Bhajni)


साहित्य : राजगिरा, साबुदाणा, वरी, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लाल मिरची, जिरे, तूप व चवीनुसार मीठ.
भाजणी करण्याची कृती ः राजगिरा, साबुदाणा व वरी समप्रमाणात घेऊन भाजावेत व एकत्र दळून आणावेत. थालीपिठाकरिता ही भाजणी जास्त दिवस करून ठेवता येते.
थालीपीठ बनविण्याची कृती : थालीपीठ करण्यासाठी एक वाटी भाजणी, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 3-4 हिरव्या मिरच्या व जिरे वाटून व मीठ एकत्र करा. जास्त तिखट हवे असल्यास लाल मिरची पावडर घालावी. थोडेसे पाणी टाकून पीठ मळून घ्यावे. तव्यावर तेल सोडून हलक्या हाताने थालीपीठ थापावे. बाजूने तूप सोडून झाकण ठेवून थालीपीठ भाजून घ्यावे. दुसरी बाजूही अशीच भाजून दह्याबरोबर खमंग थालीपीठ सर्व्ह करावे.

Share this article