साहित्यः प्रत्येकी एक कप सुरण, रताळे व बटाट्याचे उभे काप. प्रत्येकी एक जुडी पुदिना व कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 200 ग्रॅम घट्ट दही, तळण्यासाठी तेल, मीठ चवीनुसार, सजावटीसाठी डाळींबाचे दाणे व तळलेले काजू.
कृतीः कढईत तेल गरम करून बटाटे, सुरण, रताळे तळून घ्या. थंड झाल्यावर एका बाऊलमध्ये चटणी व काप घालून मिक्स करा. डाळींबाचे दाणे व काजूने सजवून सर्व्ह करा.
हिरवी चटणीः पुदिना, कोथिंबीर, मिरची, मीठ व दही एकत्र करून वाटून घ्या.
Link Copied