साहित्यः केळ्याचे कोफ्ते बनवण्यासाठी ः 2 कच्ची केळी, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 टेबलस्पून कापलेले आलं,
2 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून मैदा, तळण्यासाठी तेल, मीठ चवीनुसार.
ग्रेव्हीसाठीः 1 कप टोमॅटो प्युरी, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून एव्हरेस्ट गरम मसाला, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट,
1 टीस्पून जिरे, 1 तमालपत्र, 1 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून तेल व मीठ चवीनुसार.
कृती: कोफ्ता बनवण्यासाठीः केळी कुकरमध्ये 4-5 शिट्या काढून शिजवून घ्या. थंड झाल्यावर केळ्याचे साल काढून मॅश करा. यात कांदा, आलं, लसूण, मिरची, मैदा व मीठ टाका. छोटे-छोटे गोळे बनवून कोफ्ते तळून घ्या.
ग्रेव्ही बनवण्यासाठीः एका पॅनमध्ये तेल गरम करून जिरे व तमालपत्र टाका. आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, लाल मिरची पूड व एव्हरेस्ट गरम मसाला पावडर टाकून 3-4 मिनिटे शिजवा. कोफ्ते टाकून थोडा वेळ शिजवा व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
फलदारी कोफ्ता (Faldari Kofta)
Link Copied