Close

निरोगी कामजीवन उपभोगा, 15 वर्षे जास्त जगा (Enjoy Healthy Sex Life, Stay Awake For 15 Years More)


निरोगी कामजीवनाचा उपभोग नियमितपणे घेतला तर पती-पत्नी सदैव आनंदी राहतात. शिवाय तुमचे आयुष्यही वाढते.


निरोगी कामजीवनाचा उपभोग नियमितपणे घेतला तर पती-पत्नी सदैव आनंदी राहतात. शिवाय तुमचे आयुष्यही वाढते. नियमित सेक्स केल्याने हॉमोनची पातळी संतुलित राहते, अन् मेंदू व्यवस्थित कार्यरत राहतो. विशेष म्हणजे हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते. हृदयाचे कार्य नीट चालत राहिले तर आयुष्य जास्त वाढते.
तुमच्या कामजीवनात मंदी आली असेल तर ते पुन्हा कार्यान्वित करण्याची कोशिश करा. पुन्हा रोमॅन्टीक बनण्याचा दोघांनी मिळून प्रयत्न करा. कारण नीरस, विझू लागलेलं कामजीवन संसारासाठी आणि आरोग्यासाठी देखील धोकादायक आहे. निरोगी कामजीवनाचा शारीरिक आरोग्याशी आणि आयुष्य वाढण्याशी काय संबंध आहे ते पाहणे अधिक रोमांचक ठरेल.

  1. मोजमाप नव्हे, दर्जा बघा
    नियमितपणे शरीरसंबंध ठेवले की, आयुष्य वाढते. याचा अर्थ किती वेळा ते ठेवले याचे मोजमाप करू नका. तर ते दोघांनी मिळून किती एन्जॉय केले; हा दर्जा बघा. शरीरसंबंधांची समाधानी इतिश्री म्हणजे ऑर्गेझम्. तो चरमबिंदू गाठणे दोघांच्याही हिताचे आहे. ऑर्गेझम् गाठल्याने रोगाशी झुंज देण्याची क्षमता 20 टक्क्यांनी वाढते. सेक्स न करणार्‍या पुरुषांपेक्षा तो नियमितपणे करून ऑर्गेझम् प्राप्त करणारे पुरुष दीर्घ आयुष्य जगतात, असे एका शोध अहवालातून निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर आठवड्यातून 2 वेळा ऑर्गेझम् गाठणार्‍या स्त्रीला हृदयविकाराचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो, असे या पाहणीतून दिसून आलं आहे.
    आयुष्य 8 वर्षांनी वाढतं
    ऑर्गेझम प्राप्त झाल्याने शरीरात आनंद लहरी दौडू लागतात. तसेच त्याच्याने स्त्री-पुरुष दोघांचीही शरीरे कमालीची शिथील होऊन त्यांच्यामध्ये असलेले भावनात्मक संबंध अधिक मजबूत होतात. एकल जीवन जगणारे किंवा नकारात्मक संबंधात राहणार्‍यांपेक्षा सुखी व समाधानी जोडपी जास्त वर्षे आयुष्य जगतात.
  2. प्रेमाने आलिंगन द्या
    आपल्या जोडीदाराला प्रेमाने आलिंगन द्या. असे केल्याने किंवा अतीव प्रेमाने हातात जरी घेतला तरी त्या स्पर्शाने प्रणयभावना बळावते. ऑक्सिटॉसीन नावाचे जे हॉर्मोन आपल्या शरीरात वास करते, ते जास्त प्रमाणात स्रवू लागते आणि अंगात आनंदलहरी दौडतात. संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, ऑक्सिटॉसीन हॉर्मोन्स हे आयुष्य वाढविण्यास मदत करते. तसेच दुर्धर रोग व नैराश्य यापासून दोघांना वाचवते.
    आयुष्य 7 वर्षांनी वाढतं
    आपल्या जोडीदाराचा मूड खराब असेल, तर आपल्या प्रेमळ स्पर्शाने तो बदलू शकतो. इतकंच नव्हे तर त्याला कामोत्तेजित करतो. पार्टनरच्या स्पर्शाने शरीरात ऑक्सिटॉसीन हॉर्मोन्सचा स्राव वाढतो. अन् जोडपी एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात.
  3. जास्तीचा फायदा
    काही लोकांना उगाचच असे वाटते की, सेक्स जास्त प्रमाणात केला तर स्वास्थ्य बिघडते. पण असं काहीही नाही. उलटपक्षी आपलं कामजीवन जितकं जास्त सक्रीय राहील, तेवढेच तुम्ही स्वस्थ आणि निरोगी राहाल. एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, आठवड्यातून किमान 3 वेळा सेक्स करणार्‍या पुरुषांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होण्याचा धोका 50 टक्के कमी असतो. त्याचप्रमाणे आनंदी व सकारात्मक राहिल्याने आयुष्य वाढते. नियमित सेक्स केल्याने एन्डॉफिन्स या आनंददायी हॉर्मोन्सचा शरीरात स्राव वाढतो. त्यामुळे तुम्ही आनंदी व तणावमुक्त राहता.
    आयुष्य 2 वर्षांनी वाढतं
    कामसुखाचा जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी आपल्या जोडीदाराशी संगनमत करून त्याचे नियोजन करा. प्रेमाचे ते अतीव आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी केवळ रात्र कधी होईल याची वाट पाहू नका. मुलं घरात नसतील तेव्हा किंवा जेवणाच्या सुट्टीत किंवा घरात इतर माणसे नसतील, तेव्हा एकांत मिळाला की, कामसुखाचा आनंद मिळवा.
  4. मूड सेट करा
    कामसुखाचा आनंद घेण्यासाठी मूड चांगला असावा लागतो. हा मूड चांगला राहण्यासाठी मेंदुतील काही रसायने जबाबदार असतात. त्यांचे संतुलन राखावे लागते. याशिवाय धकाधकीच्या जीवनात जोडप्यांची सेक्समध्ये रुची जरा कमी होते. अशा अडचणींवर मात करण्यासाठी मेंदुतील रसायनांचे संतुलन राखण्यासाठी व आपले कामजीवन सक्रीय ठेवण्यासाठी आहारात या काही गोष्टींचा समावेश जरुर करावा. तुळस, मिरे, जिरे, लसूण, आले, हळद, केळी, चॉकलेट्स आणि रेड वाईन.

  5. आयुष्य 10 वर्षांनी वाढतं
    आपल्या जोडीदाराचा लगेच मूड सेट करावा असे वाटत असेल, तर त्याला रात्रीचे जेवण हलकेफुलके द्या. जड पदार्थ देऊ नका. सात्विक भाज्यांचा जेवणात समावेश करा अन् केशरी भात द्या.
  6. फिट आणि फाईन ठेवा
    तरुणपणी आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते तर वय वाढले की ती कमी होत जाते. या संबंधात एक चांगली बातमी अशी आहे की, आपण जर निरामय कामजीवन उपभोगलं तर आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते. एका संशोधनातून असं उमगलं आहे की, आठवड्यातून 2 वेळा तरी कामसुख घेणार्‍यांच्या अंगात न्टी बॉडीज्चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सर्दी, फ्लू सारख्या आजारांपासून त्यांचे रक्षण होते. त्यामुळे तुम्ही कितीही कामात असलात तरी आठवड्यातून किमान 2-3 वेळा कामसुख उपभोगण्यासाठी वेळात वेळ काढा.
    आयुष्य 8 वर्षांनी वाढतं
    निरोगी कामजीवनासाठी मद्याचे प्रमाण कमी करा. कारण अति मद्य घेतल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
  7. व्यायामासारखा फायदा
    आपण व्यायाम नियमितपणे केला तर शरीरातील रक्तसंचार वाढतो. स्नायू मजबूत होतात आणि तुम्ही तरुण दिसू लागता. विशेष म्हणजे नियमितपणे कामसुख घेतले तर व्यायामाचे हे सर्व लाभ तुम्हाला मिळतात. नियमितपणे सेक्स केला तर 20 मिनिटात 30 कॅलरीज् बर्न होतात. इतकंच नव्हे तर हाडांचे विकार देखील होत नाहीत. एका पाहणी अहवालानुसार मध्यमवयीन स्त्रीने आठवड्यातून एकदा जरी सेक्स केला तरी त्यांच्या शरीरातील स्टोजनची पातळी वाढते. ज्यामुळे हाडांना संरक्षण मिळते.
    आयुष्य 10 वर्षांनी वाढतं
    कामसुख घेताना एकाच प्रकारे करु नका. कामजीवनात वेगळेपणा आणण्यासाठी काही नवे प्रयोग करा. नवी संभोगासने करा. संभोगासनांचे प्रकार असलेल्या पुस्तकातून ही आसने मिळतील.
  8. हृदय निरोगी ठेवा
    सिगारेटचे व्यसन करू नका. असल्यास त्वरीत सोडा. कारण धूम्रपान सोडल्याने व लठ्ठपणा कमी केल्याने आपण हृदय निरोगी ठेवाल. निरामय कामजीवन आणि चांगले आरोग्य टिकविल्याने देखील आपले हृदय मजबूत राहील. इंग्लंड रिसर्च इन्स्टिट्यूटने अलिकडेच असा शोध लावला आहे की, आठवड्यातून किमान दोनदा सेक्स करणार्‍यांचा हृदयविकाराचा धोका 45 टक्के कमी होतो. अन् आठवड्यातून किमान तीन वेळा सेक्स करणार्‍यांचा हृदयविकाराचा धोका 50 टक्के कमी असतो.
    आयुष्य 15 वर्षांनी वाढतं
    प्रणय आणि सेक्स करताना एकमेकांना उत्तेजित करणारा मसाज करा. त्याच्याने तणाव दूर होईल. आपल्या प्रेमाने ओथंबलेल्या स्पर्शाने जोडीदाराचा मूड सेट करा. म्हणजे निरामय कामजीवनाने आयुष्य खूप वाढेल. अगदी 15 वर्षांपर्यंत तरी वाढलेच.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/