एग चाट साहित्य : 5 अंडी (कडक उकडून, बारीक तुकडे केलेली), 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, पाव कप उकडलेली कडधान्यं, 2 टेबलस्पून उकडलेला बटाटा, 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 टीस्पून हिरवी चटणी, 1 टीस्पून चिंचेची गोड चटणी, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, चवीनुसार मीठ. कृती : कोथिंबीर सोडून उर्वरित सर्व साहित्य एकत्र करा. वरून कोथिंबिरीने सजवा आणि सर्व्ह करा. टीप : अंडं कडक उकडण्यासाठी, एका भांड्यात 2 इंच पाणी घेऊन अंडी उकडा. पाणी उकळलं की, भांडं आचेवरून खाली ठेवून 12 मिनिटांसाठी भांड्यावर झाकण लावून ठेवा. नंतर अंडी बाहेर काढून बर्फाच्या पाण्यामध्ये थंड करण्यास ठेवा. नंतर अंडं सोलून त्याचे चार तुकडे करा आणि त्यातील पिवळा बलक बाजूला काढून ठेवा. एग पिझ्झा साहित्य : 4 अंडी (कडक उकडून चकत्या केलेली), 4 लहान पिझ्झा बेस, काही थेंब ऑलिव्ह तेल, 8 टोमॅटो (चकत्या केलेले), थोडे मोझारेला चीझ किसलेले, थोडे ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ. कृती : ओव्हनमध्ये पिझ्झा बेस टोस्ट करून घ्या. त्यावर ऑलिव्ह तेल लावा. त्यावर टोमॅटो आणि अंड्याच्या चकत्या पसरवा. त्यावर किसलेलं चीझ पसरवा. वरून ऑरेगॅनो आणि मीठ भुरभुरा. चीज वितळेपर्यंत बेक करा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied