सुखद गारव्याने भरलेली हवा आणि उबदारपणाची भावना हिवाळा जादूई भासत असला तरीही बरेचदा तो आपल्यासोबत सर्दी, फ्लू आणि इतर मोसमी आजारांसह तब्येतीच्या कितीतरी समस्या घेऊन येतो. या काळामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती बळकट बनविणे हे या नेहमीच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रबळ रोगप्रतिकारशक्ती बनवण्याचा एक प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे होमियोपॅथी, औषधोपचारांची एक अशी पद्धती जी तुमच्या शरीराच्या संरक्षक यंत्रणेला उभारी देण्यासाठी सर्वांगीण पद्धतीने काम करते, असे बत्राज हेल्थकेअरचे संस्थापक व चेअरमन एमेरिटस, पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी सांगितले. ते पुढे म्हणतात-
होमियोपॅथी ही शरीराच्या नैसर्गिक रोगशामक यंत्रणांना उत्तेजना देण्याच्या तत्त्वावर काम करते. बहुतेकदा केवळ लक्षणांवर भर देणाऱ्या पारंपरिक औषधोपचारांहून वेगळी असलेली होमियोपॅथी प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट घडण आणि लक्षणे विचारात घेऊन उपचारांसाठी वैयक्तिकृत दृष्टिकोन बाळगते. यामुळे समस्येवर नेमकेपणाने लक्ष्य साधणारी अशी एक उपचारपद्धती अवलंबिण्यास वाव मिळतो, जी सौम्य तर असतेच पण दुष्परिणामांपासूनही मुक्त असते.
सर्दी आणि फ्लूसारखे हिवाळी आजार बरेचदा टाळता येत नाहीत, पण या आजारांसाठी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना म्हणून होमियोपॅथीचा उपयोग होऊ शकतो. शरीराला संसर्गांचा हल्ला होण्याआधीच तो परतवून लावण्यासाठी सुसज्ज बनविणे ही होमियोपॅथी औषधांची कार्यपद्धती आहे.
होमियोपॅथीचा आणखी एक आगळावेगळा पैलू म्हणजे या पद्धतीत वापरला जाणारा उपचारांचा वैयक्तिकृत दृष्टिकोन. ‘सर्वांसाठी एकच उपाय’ हे तत्व न अनुसरता होमियोपॅथीचे डॉक्टर्स प्रत्येक व्यक्तीची घडण, जीवनशैली आणि लक्षणे यांचे मूल्यमापन करून खास त्यांच्या गरजेनुसार बेतलेल्या औषधांची शिफारस करतात. यामुळे अधिक प्रभावी परिणाम मिळतात आणि आजार पुन्हा-पुन्हा डोके वर काढण्याच्या मूळाशी असलेल्या कारणांवर इलाज करतात.
युवाप्रौढ वयोगटातील व्यक्तींच्या बाबतीत ही औषधे उत्साहाची पातळी व चिवटपणा यांना बळकटी देण्यावर लक्ष करतात तर वयोवृद्धांसाठी दीर्घकालीन आजार किंवा कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. होमियोपॅथिक औषधांची प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार दिलेल्या पोषण व जीवनशैलीशी निगडित सल्ल्यांशी सांगड घातल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनविण्याची एक सर्वांगीण योजना यशस्वीपणे तयार करणे शक्य आहे.