Close

उन्हाळ्याच्या सीजनमध्ये केळी खाण्याचे फायदे काय? (Eating Bananas In Summer Has Many Health Benefits)

वर्षाचे बारा महिने बाजारात उपलब्ध असलेले आणि सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे केळी. चवीप्रमाणे केळी आरोग्यासाठी चांगली असतात. केळीमध्ये अनेक महत्वाचे गुणधर्म आढळून येतात. केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. गोड, पिवळ्या रंगाची केळी बाजारात सहज उपलब्ध होतात. हिरवी केळी ही भाजीसाठी वापरली जातात. उन्हाळ्यात केळी खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. केळी खाल्ल्याने आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

उन्हाळा ऋतूमध्ये केळीचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते.  मॅग्नेशियम(magnesium), पोटॅशियम (Potassium) , व्हिटॅमिन बी6 (Vitamin B6) आणि इतर अनेक पोषक तत्वे केळीमध्ये आढळतात. जे पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

पचनक्रिया सुधारते : उन्हाळ्यात लोकांना पचनाच्या समस्या येतात. अशा स्थितीत या ऋतूत केळीचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहते. पचनक्रिया सुधारून तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडण्यापासून वाचता. त्यामुळे रोज केळीचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

लूज मोशनमध्ये फायदेशीर : या ऋतूत उष्णतेमुळे लोकांना लूज मोशनचा त्रासही होतो. अशा परिस्थितीत केळीचे सेवन केल्याने त्यांना तात्काळ आराम मिळू शकतो. काळे मीठ मिसळून केळी खाल्ल्यास आराम मिळेल. यासोबतच केळीसोबत साखरेचे काही दाणे खाल्ल्यानेही तुम्हाला फायदा होईल.

रक्त पातळ ठेवते : केळी शरीरातील रक्त पातळ ठेवण्यास मदत करते. केळी रक्ताभिसरण देखील सुधारते. केळ्यामध्ये मॅग्नेशियम असते ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी झाले की रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरणही सुरळीत होते.

बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर : केळीचे सेवन बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी संजीवनी औषधी वनस्पतीसारखे आहे. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळेल. यासाठी केळीसोबत दूध प्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेवर फायदा होतो.

कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते : केळ्यामध्ये मॅग्नेशियम असते ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी झाले की रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरणही सुरळीत होते. केळी ही बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी संजीवनी औषधी वनस्पतीसारखे आहे. केळीचे रोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्यपासून आराम मिळते. यासाठी केळी सोबत दुध पिले जाते. रोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन केल्यास बद्धकोष्ठतेवर फायदा होतो.

रक्तदाब आणि हृद्यविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त केळी उपयोगी आहे. ज्या लोकांना मधुमेह (diabites) आहे. त्यांनी फार केळी खाऊ नये. इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरचे प्रमाण जास्त असते. केळी शरीराला उच्च उष्मांक ऊर्जा प्रदान करते. केळयांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे आतड्यांचे काम सुधारते. केळयांमध्ये फायबर आहे त्यामुळे केळी खाल्ल्यावर पोट भरते.

Share this article