Close

द्राक्षं खा आरोग्य जपा (Eat Grapes And Take Care Of Health)

आहारात रोज फळांचा समावेश असावा असा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. प्रत्येक मोसमानुसार बाजारात वेगवेगळी फळं उपलब्ध असातत. त्यातीलच थंडीच्या दिवसात मिळणारे फळ म्हणजे द्राक्ष…
चवीला अतिशय रूचकर लागणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं खातात ते फळ म्हणजे द्राक्ष! द्राक्ष खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. तसेच अनेक प्रकारांचे आजार होऊ नये म्हणून द्राक्षातील घटक आपल्याला मदत करतात.
रोज सकाळी आणि संध्याकाळी 4-4 चमचे द्राक्षांचा रस भोजनानंतर सेवन केल्यास बुध्दी आणि स्मरणशक्तीचा विकास होतो. द्राक्ष खाल्ल्याने लठ्ठपणा, सांधेदुखी, रक्ताच्या गाठी होणे, दमा आणि त्वचेवर लाल डाग येणे अशा समस्या दूर होतात. तसेच द्राक्षांचे सेवन केल्याने रक्ताची उलटी होणे, बध्दकोष्ठ, मूत्राच्या समस्या, अतिसार इत्यादी रोगांमध्येही फायदा होतो.
रक्ताची कमतरता असल्यावर द्राक्षांच्या एक ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून नियमित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
पोटातील उष्णता कमी करण्यासाठी 20-25 द्राक्षे रात्री पाण्यात भिजवा. सकाळी कुस्करून पिळून घ्या. या रसामध्ये थोडीशी साखर मिसळा, आराम मिळेल.
चेहर्‍यावरील मुरमं कमी करण्यास द्राक्षं मदत करतात. तसंच तोंड आलं असल्यास द्राक्षाच्या रसाने गुळण्या केल्यास त्रास कमी होतो.
द्राक्ष आणि मोसंबीचा रस समान प्रमाणात मिक्स करून घेतल्याने मासिक पाळी संबंधित अनियमितता दूर होते.
द्राक्षांमध्ये प्रोटीन्स, पोटॅशिअम, फॉस्फरस, कार्बोहायर्डेट, तसेच ग्लुकोजचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असणार्‍यांना द्राक्ष खाल्ल्याने खूप फायदा होतो.
आपल्या शरीरातील काही अनावश्यक द्रव्य शरीरातून बाहेर काढण्यासाठी द्राक्षातील साखर खूपच उपयुक्त ठरते.
पित्त वाढल्यास द्राक्षं खाणे फायदेशीर ठरते.

Share this article