आजकाल पांढरे केस काळे करण्याची फॅशन बळावते आहे. त्यासाठी हेअर कलर्सचा सर्रास वापर होत आहे. मात्र या कामासाठी जी उत्पादने आपण वापरतो, त्यापैकी सर्वच उत्पादने दर्जेदार नसतात. अशी सामान्य उत्पादने वापरण्यापेक्षा हायलुरोनिक व सिलीकॉन ॲक्टिव्हज् आणि किवी फळांचा रस हे सर्वोत्तम आहेत. हे घटक असलेल्या फॉर्म्युलेशनसह हेअर कलर करा. त्यांचा एकत्रित परिणाम केसांना आकर्षक रंग व शाईन देतात, असे स्कीन केअर स्पेशालिस्ट डॉ. अनुप्रिया गोयल सांगतात. त्या पुढे म्हणतात -
केसांचे नुकसान होण्यापासून उत्तम संरक्षण
व्हिटॅमिन्स सी, ई व के असलेले किवी केसांना मुळांपासून मजबूत करते, ज्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. किवीमुळे कोलॅजन निर्मिती होते, जे केसांची वाढ करते आणि केस तुटणे कमी करते; हायलुरोनिक ॲक्टिव्हजच्या हायड्रेटिंग क्षमतेसह संयोजन असलेली ही जोडी केस ड्राय होण्याला प्रतिबंध करते, तसेच केस कोमल व मजबूत बनवते. सिलिकॉन्स अतिरिक्त संरक्षण देतात, ज्यामुळे केसांना सहज स्टाइल करता येते आणि केसांमधील मॉइश्चर कायम राहते. यामुळे केस तुटण्याचा धोका कमी होतो आणि कलर केलेले केस स्वस्थ व लांबसडक होतात.
केस पांढरे होण्यापासून संरक्षण
किवीमधील ॲण्टीऑक्सिडण्टसह व्हिटॅमिन्स सी व ई ऑक्सिडेटिव्हस् ताण कमी करत अकाली केस पांढरे होण्यापासून संरक्षण करतात. यामधील कॉपर घटक मेलानिन निर्मितीला सहाय्य करते, ज्यामुळे हेअर कलर कायम राहतो आणि केसांची चमक वाढते.
टाळू आरोग्यदायी ठेवण्याला चालना
किवी ओमेगा-३ फॅटी ॲसिड्ससह टाळूला पोषण देते, जळजळ कमी करते आणि केसांच्या आरोग्यदायी वाढीसाठी रक्ताभिसरण सुधारते. हायलुरोनिक ॲक्टिव्ह्ज् केसांना हायड्रेशन देतात, केस दाट होण्याला प्रतिबंध करतात आणि एकूण टाळूचे आरोग्य उत्तम राखण्यास सहाय्य करतात.
पर्यावरणीय स्ट्रेसर्सपासून संरक्षण
हायलुरोनिक ॲक्टिव्हज व सिलिकॉन्स केसांभोवती संरक्षणात्मक कवच निर्माण करतात, केसांचे अतिनील किरणे, प्रदूषण व दैनंदिन स्ट्रेसर्सपासून संरक्षण करतात. हे दुहेरी संरक्षण कलर केलेल्या केसांची आकर्षकता कायम ठेवण्यास मदत करते.
केसांची काळजी घेण्यामध्ये वाढ आणि शाइन मिळवणे
हायलुरोनिक ॲक्टिव्हज केसांमधील ओलावा कायम राखत केस कुरळे होणे कमी करतात, ज्यामुळे केसांना सहजपणे स्टाइल करता येते. सिलिकॉन्स केसांची वाढ करतात, केस रुक्ष होण्यावर नियंत्रण ठेवतात आणि केसांना ग्लॉसी फिनिश देतात, ज्यामुळे कलर केलेल्या केसांची आकर्षकता वाढते. किवीच्या पोषक फायद्यांनी युक्त हे घटक केसांना शाइन देतात, केस मजबूत व आकर्षक करतात.
थोडक्यात, आकर्षक केसांसाठी आरोग्यदायी टाळू आवश्यक आहे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन सी, ई व के ने संपन्न किवी टाळूला पोषण देते, तसेच रक्ताभिसरण सुधारते. हायलुरोनिक ॲक्टिव्ह्ज टाळू व केसांना हायड्रेटेड ठेवतात, केस दाट होण्याला प्रतिबंध करतात. कलर केलेल्या केसांसाठी हायलुरोनिक ॲक्टिव्ह्ज व सिलिकॉन्सचे मिश्रण पर्यावरणीय नुकसानापासून केसांचे संरक्षण करते, हेअर कलर कायम टिकू देते, केसांची वाढ करते आणि केसांची शाइन वाढवते. तुमच्या रूटिनमध्ये या घटकांचा समावेश केल्यास केस कोमल, आरोग्यदायी राहण्यासोबत सहजपणे व्यवस्थित राखता येण्याची खात्री मिळते.