अभिनेते धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही धर्मेंद्र आणि त्यांचे सिनेमे हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि वयाच्या 89 व्या वर्षीही ते सिनेसृष्टीमध्ये सक्रिय आहेत. पण सध्या चाहते धर्मेंद्र यांचा बायोपिक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्यांच्या बायोपिकमध्ये धर्मेंद्र यांची भूमिका कोणी साकारावी याबाबत स्वत: धर्मेंद्र यांनी भाष्य केलं आहे.
धर्मेंद्र यांना त्यांच्या बायोपिकमध्ये त्यांची मुलं सनी आणि बॉबी देओल या दोघांनाही पाहण्यास इच्छुक नाहीत. तर त्यांना त्यांच्या बायोपिकमध्ये त्यांच्या भूमिकेत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पाहण्याची इच्छा आहे. सलमान खान या भूमिकेसाठी उत्तम पर्याय असल्याचं धर्मेंद्र यांनी म्हटलं होतं. त्यामुळे धर्मेंद्र यांचा बायोपिक झाला तर सलमान खानला स्वत:च्या भूमिकेत पाहण्यासाठी धर्मेंद्र इच्छुक आहेत.
धर्मेंद्र यांनी 2018 मध्ये मुलाखतीदरम्यान याविषयी भाष्य केलं होतं. त्यांना विचारण्यात आलं होतं की, जर त्यांच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्यांची भूमिका साकारण्यासाठी कोण योग्य असेल. यावर उत्तर देताना धर्मेंद्र यांनी म्हटलं होतं की,"मला वाटते की सलमान खान बायोपिकमध्ये माझी भूमिका साकारू शकतो. तो माझा लाडका आहे आणि त्याला माझ्यासारख्या काही सवयी आहेत.”
कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलने सलमान खानसोबतच्या त्याच्या वडिलांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्याने खुलासा केला की, सलमान नेहमीच त्यांच्यासोबत असतो आणि त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम करतो. माझे वडील आणि सलमान यांच्यामध्ये खूप सुंदर असा बॉन्ड आहे. सलमान माझ्या वडिलांचा खूप आदर करतो. माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी त्याचे मन खूप मोठे आहे.