सर्वसाधारणपणे संगीताचे कार्यक्रम रात्रीच होतात. संगीताची मैफिल असो व रंगमंचावरील ऑर्केस्ट्रा कार्यक्रम रात्रीच रंगतात पण परवाच्या दिवशी हा प्रघात मोडून दुपारी एक सुरांची महफिल रंगली होती. रॅडीको खैतान प्रस्तुत मॅजिक मोमेन्टस् म्युझिक स्टुडिओ आयोजित सीझन १ चा हा संगीतमय कार्यक्रम झाला. त्यामध्ये ‘सारेगम’ या अग्रगण्य संगीत कंपनीने संधी दिलेल्या तरुण गुणी गायकांनी आपले गायनकौशल्य सादर केले.
या संगीतमय कार्यक्रमाचं नेतृत्व अभिजीत वाघानीने केले. तर निखिता गांधी, नेहा करोडे, जान कुमार सानू, भृगु पराशर यांनी त्याला साथ दिली. ‘रिमझिम गिरे सावन’, ‘जरा जरा’, ‘हतुबा हतुबा’ अशा अनेक जुन्या चित्रपट गीतांनी ही मैफिल रंगली.
जुन्या गाजलेल्या चित्रपटांमधील गाणी हे गुणी गायक ‘सारेगम’च्या यूट्यूब चॅनलवर सादर करतात. चांगल्या गाण्यांना नवा साज देण्याचा कंपनीचा हा उपक्रम आहे.
खूप वर्षांपूर्वी गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या आवाजात इतर गायकांनी गायलेल्या गाण्यांचा अल्बम याच कंपनीने सादर केला होता. त्याची आठवण आत्ताच्या उपक्रमाने आली.