Close

डाळीचे ढोकरे व बुंदी – पापडाची भाजी (Daliche Dhokare and Bundi -Papad bhaji)

डाळीचे ढोकरे
साहित्य: 2 कप भिजवलेली चणा डाळ, 1 चौकोनी तुकडे केलेला बटाटा, 1 टीस्पून गरम मसाला , 1 टेबलस्पून धण्याची पेस्ट, 1 टेबलस्पून धणे-जिरे पूड, पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद, पाव कप दही, 2 टेबलस्पून आलं पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून तूप, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.
कृती: चणाडाळ, आलं, मीठ व हिरवी मिरची एकत्र करून वाटून घ्या. गरम मसाला, जिरे व धणे एकत्र भाजून वाटा. कढईत तेल गरम करून चणा डाळीचे मिश्रण त्यातील पाणी आटेपर्यंत परतून घ्या. हे मिश्रण तेल लावलेल्या ताटात पसरवा. शंकरपाळीच्या आकारात कापून खरपूस तळून घ्या. कापलेले बटाटे डीप फ्राय करा. उरलेल्या तुपात आलं पेस्ट, भाजलेले गरम मसाले, धणे-जिरे पूड, लाल मिरची, मीठ व दही टाकून परतून घ्या. तळलेले बटाटे व पाणी टाकून शिजवून घ्या. तळलेले ढोकरे टाका. 2-3 मिनिटे शिजवा. ढोकरे शिजल्यानंतर तूप व गरम मसाला टाका. भातासोबत गरम-गरम सर्व्ह करा.

बुंदी - पापडाची भाजी
साहित्य: 1 कप खारी बुंदी, 4 पापड (तुकडे करून), 1 चिरलेला टोमॅटो, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून राई व 1 कप पाणी.
कृती: तेल गरम करून त्यात राईची फोडणी द्या. टोमॅटो व काश्मिरी लाल मिरची पूड टाकून 3-4 मिनिटे शिजवा. 1 कप पाणी टाका. एक उकळी येऊ द्या. सगळे साहित्य घालून थोडा वेळ शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.

Share this article