Close

कच्च्या केळ्यांचे दहीवडे (Dahivade Of Raw Bananas)

साहित्य : 1 डझन कच्ची केळी, पाऊण वाटी शिंगाडा किंवा वरी अथवा राजगिर्‍याचे पीठ, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 10-12 हिरव्या मिरच्या, चिमूटभर खाण्याचा सोडा, साखर, जिरेपूड, 3 वाट्या दही, चवीनुसार मीठ व सैंधव.
कृती : केळी सोलून कुकरमध्ये उकडून घ्यावीत. हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्यात. थंड झाल्यावर वाटून यात जिरेपूड, वाटलेली मिरची व मीठ घालावे. या मिश्रणाचे गोल चपटे वडे करून घ्यावेत. वरी किंवा शिंगाडा वा राजगिर्‍याचे पीठ पाण्यात मिसळावे. यात मीठ टाकून आवरणासाठी मिश्रण तयार करावे. कढईत तेल गरम करावे. आवरणाच्या मिश्रणात तयार केलेले वडे बुडवून तळून घ्यावेत. तळलेले वडे थोडा वेळ पाण्यात ठेवावेत, बाहेर काढून हलक्या हाताने दाबून पाणी काढून टाकावे. आता एका भांड्यात दही घुसळून घ्यावे. यात साखर, सैंधव, जिरे पूड टाकावी. तयार वडे या दह्यात सोडावेत. सर्व्ह करताना थोडीशी मिरची पावडर भुरभुरवून केळ्याचे दहीवडे सर्व्ह करावेत.

Share this article