दही भेंडी
साहित्य: 200 ग्रॅम भेंडी, 150 ग्रॅम दही (मलमलच्या कपड्यात बांधून लटकत ठेवा, जेणेकरून दह्यातील सर्व पाणी निघून जाईल), 5 ग्रॅम हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 5 ग्रॅम काळे मीठ.
कृती: भेंडी बारीक चिरून तळून घ्या. यात दही व इतर साहित्य मिक्स करा. थंड होऊ द्या. पोळीसोबत सर्व्ह करा. हे टोस्ट स्प्रेड म्हणून सुद्धा वापरू शकता.
व्हेजिटेबल कोकोनट स्ट्यूू
साहित्य: 5 ब्रोकोली, 50 ग्रॅम मटार, 2 गाजर, 1 झुकिनी (चायनिज काकडी), 3 बेबीकॉर्न, 1 बटाटा, 2 तमालपत्र, 2 तुकडे दालचिनी, 6 काळी मिरी, गरजेनुसार खोबरेल तेल, 400 मि.ली. नारळाचे ताजे दूध, मीठ चवीनुसार.
कृती: सर्व भाज्या एकाच आकारात चिरून घ्या. एका पॅनमध्ये खोबरेल तेल गरम करून त्यात मसाले टाका. पाणी टाकून उकळी येऊ द्या. बटाटा व गाजर टाका. झाकण ठेवून शिजवा. त्यानंतर इतर साहित्य टाका. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. भाज्या शिजल्यानंतर नारळाचे दूध घालून सतत ढवळत राहा. 5 मिनिटे शिजवा. नारळाच्या ताज्या मलईने सजवून अप्पम किंवा ब्रेडसोबत गरम-गरम सर्व्ह करा.