सिताफळ आईस्क्रीम
साहित्यः 2 लिटर दूध, 1 किलो सिताफळ, 1 वाटी साखर, 1 वाटी क्रीम, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चमचे चायना ग्रास.
कृतीः सिताफळ सोलून घ्यावीत. दूध आटवून 1 लिटर करावे. थंड दुधात कॉर्नफ्लोअर व चायना ग्रास मिसळून उकळत्या दुधात ओतावे. गॅस बंद करून दुधात साखर घालावी. दूध थंड झाल्यावर सिताफळाचा सोललेला अर्धा गर व क्रीम मिक्सरमधून काढून एकत्र करावे. त्यात सोललेला अर्धा गर न वाटताच घालावा. चमच्याने ढवळून अॅल्युमिनियमच्या भांड्यात ओतून फ्रिझरमध्ये सेट व्हायला ठेवावे. आईस्क्रीम सेट झाल्यावर पुन्हा मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे व फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. पूर्ण सेट झाल्यावर बाऊलमध्ये काढून गारेगार आईस्क्रीम सर्व्ह करावे.
द्राक्षाचे आईस्क्रीम
साहित्यः 500 ग्रॅम द्राक्षे, 500 ग्रॅम दही, एक पेला साखर, अर्धा पेला दुधाची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, पाव पेला क्रीम.
कृतीः द्राक्षं मिक्सरमध्ये वाटून गर तयार करून घ्या. दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवा. पाणी निथळून गेलेलं दही कपड्यातून काढा व त्यात पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस व द्राक्षाचा गर एकत्र करून सेट व्हायला ठेवा. अर्धवट सेट झालेलं आईस्क्रीम बाहेर काढा व मिक्सरमधून पुन्हा फिरवा. पुन्हा सेट व्हायला ठेवा. सर्व्ह करताना द्राक्षांनी सजवा.