Close

काकडीचे थालीपीठ (Cucumber Thalipith)

काकडीचे थालीपीठ
साहित्य : 1 वाटी किसलेली काकडी, अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा, 1 उकडलेला बटाटा, एक वाटी उपवासाची भाजणी, 3-4 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, अर्धा टीस्पून आले, तेल, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : किसलेली काकडी, उकडलेला बटाटा, भिजवलेला साबुदाणा व उपवासाची भाजणी एकत्र करून नीट मळून घ्या. यात हिरव्या मिरच्यांची पेस्ट, आल्याची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, मीठ व साखर घालून चांगले एकजीव करा. यात पाणी टाकण्याची गरज नसते. परंतु मिश्रण कोरडे वाटत असल्यास पाण्याचा हात लावून मळा. या मिश्रणाची थालीपिठे थापून पॅनवर तेल वा तूप टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. दही
वा ओल्या खोबर्‍याच्या चटणीसह ही थालीपिठे सर्व्ह करा.

Share this article