Close

क्रिस्पी पोटॅटा कॉर्न पकोडा आणि पार्मेसन रोझमेरी पोटॅटो चिप्स (Crispy Potato Corn Pakoda And Parmesan Rosemary Potato Chips)

क्रिस्पी पोटॅटा कॉर्न पकोडा
साहित्य : दीड कप उकडलेले मक्याचे दाणे, 1 कप उकडून कुस्करलेला बटाटा, अर्धा कप किसलेलं प्रोसेस्ड चीझ,
2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल.
कृती : तेल सोडून उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्या. कढईत ते गरम करून त्यात मध्यम आकाराचे पकोडे अलगद सोडा. पकोडे मंद आचेवर सोनेरी रंगाचे कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरमागरम क्रिस्पी पोटॅटो कॉर्न पकोडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

पार्मेसन रोझमेरी पोटॅटो चिप्स
साहित्य : 2 बटाटे, दीड टेबलस्पून रोझमेरी हर्ब्स बारीक चिरलेल्या, दीड कप पार्मेसन चीझ किसलेलं, आवश्यकतेनुसार ऑलिव्ह ऑईल, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड.
कृती : बटाटे धुऊन, त्याच्या पातळ चकत्या चिरून घ्या. टिश्यू पेपरवर बटाट्याच्या चकत्या पसरवून 15 मिनिटं सुकत ठेवा. आता एका वाडग्यात बटाट्याच्या चकत्या, ऑलिव्ह ऑईल, मीठ, काळी मिरी पूड आणि रोझमेरी हर्ब्स व्यवस्थित एकत्र करून घ्या. बेकिंग ट्रेमध्ये बेकिंग शीट लावून त्यावर ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्या. त्यावर बटाट्याचा थर पसरवून ओव्हनमध्ये 400 डिग्री सेल्सियसवर 40 मिनिटं बेक करा.
टीप : बेकिंग करताना, शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना ट्रे ओव्हनमधून बाहेर काढून, त्यावर पार्मेसन चीझ भुरभुरून पुन्हा पाच मिनिटांसाठी ओव्हनमध्ये ठेवता येईल.

Share this article