चटकदार इडली
साहित्य: 6 इडल्या, 2 बटाटे, तळण्यासाठी तेल, 2 वाट्या ताजे दही, आंबट-गोड चटणी, पुदिन्याची चटणी, चाट मसाला, कोथिंबीर
कृती: इडली आणि बटाटे कापून घ्या. कढईत तेल गरम करा. बटाटे आणि इडल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. सर्व्ह करण्यापूर्वी त्यात दही, आंबट-गोड चटणी आणि पुदिन्याची चटणी घालावी. वर चाट मसाला घाला आणि हिरव्या कोथिंबिरीने सजवा.
बटाटा पिझ्झा
साहित्य: 250 ग्रॅम बटाटा, 100 ग्रॅम टोमॅटो, 1 सिमला मिरची गोलाकार कापून घ्या, 1/4 कप उकडलेले मक्याचे दाणे, 1 गोल कापलेला कांदा, 8-10 ऑलिव्ह, काही मशरूम.
कृती: बटाटे उकडून मीठ घालून मॅश करा. टोमॅटोची प्युरी करून त्यात मीठ घाला. मॅश केलेल्या बटाट्यांना चपटा आकार देऊन पिझ्झा बेस बनवा , सिमला मिरची, कॉर्न ,कांदे, ऑलिव्ह आणि मशरूम घालून टॉपिंग तयार करा.
400 अंश डिग्री सेल्शिअसवर ओव्हनमध्ये 15 मिनिटे बेक करावे. टोमॅटो प्युरी बरोबर सर्व्ह करा.