क्रॅकलिंग पनीर
साहित्यः 100 ग्रॅम पनीर, 200 ग्रॅम पालक, चिमूटभर हिंग, प्रत्येकी 2 टीस्पून कॉर्नफ्लोर व मैदा, 5 ग्रॅम छोटी लाल मिरची, 5 ग्रॅम साखर, प्रत्येकी 2 टीस्पून लिंबाचा रस, पांढरे तीळ, मीठ व काळी मिरी पूड चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
कृतीः पालक धुवून चिरून घ्या. चिरलेला पालक कॉर्नफ्लोर व मैद्यात घोळवून तळून घ्या. यात साखर, छोटी लाल मिरची व पांढरे तीळ मिक्स करा. पनीर कॉर्नफ्लोर व मैद्याच्या मिश्रणात घोळवून तळून घ्या. कढईत लिंबाचा रस व साखर घालून लेमन सॉस बनवा. यात मीठ, काळी मिरी पूड व हिंग घाला. सर्वात शेवटी पनीर घाला. सर्व्ह करताना तळलेला पालक व पनीर वेगवेगळे सर्व्ह करा.
मका शिमला मिरची
साहित्य: 75 ग्रॅम मक्याचे दाणे, 75 ग्रॅम भोपळी मिरची, 1 मध्यम आकाराचा कांदा, 1 टोमॅटो, अर्धा कप कोथिंबीर, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टेबलस्पून धणे पूड, पाव टेबलस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, दीड टेबलस्पून तेल, अर्धा कप मावा, 30 मि.ली. ताजे क्रीम, मीठ चवीनुसार.
कृती: मक्याचे दाणे उकडून पाणी गाळून घ्या. भोपळी मिरचीच्या बिया काढून तुकडे करा. कांदा बारीक चिरा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करून जिरे टाका. जिरे तडतडल्यावर कांदा टाका व खरपूस परतून घ्या. आलं-लसूणाची पेस्ट टाकून 1-2 मिनिटे परता. आता लाल मिरची पूड, धणे, जिरे पूड व हळद टाका. मसाल्याला तेल सुटल्यावर पाव कप पाणी व मावा टाकून शिजवा. आता यात मक्याचे दाणे, भोपळी मिरची, गरम मसाला व मीठ टाकून मंद आचेवर शिजवा. ताजे क्रीम व कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.