Close

कॉर्न पनीर तवा फ्राय (Corn Paneer Tawa Fry)

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट आणि चवीष्ट पदार्थ बनवायचा असेल तर कॉर्न पनीर तवा फ्राय बनवून बघा. नक्की आवडेल.

साहित्य :

१ टेबलस्पून तेल

१ टीस्पून बारीक केलेला लसूण

२ टीस्पून बटर

प्रत्येकी अर्धा-अर्धा कप कार्न पेस्ट आणि दही

१-१ टीस्पून जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि

पावभाजी मसाला

अर्धा टीस्पून हळद

मीठ चवीनुसार

२ कांदे (बारीक चिरलेले)

१-१ कप उकडलेले मक्याचे दाणे आणि पनीर क्युब्स

मीठ चवीनुसार

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :

एका पॅनमध्ये तेल आणि बटर गरम करून त्यावर लसूण परतून घ्या. लसूण सोनेरी रंगाचा झाला की त्यात कॉर्न पेस्ट घालून २-३ मिनिटं परतून घ्या. नंतर त्यात दही, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर आणि जिरे पूड घालून मिश्रण व्यवस्थित परतत राहा.

कांदा आणि मका घालून नरम होईपर्यंत परता. त्यात अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून शिजवा. नंतर त्यात मीठ, पनीर क्युब्स आणि कोथिंबीर घालून आच बंद करा.

ही भाजी पराठ्यासोबत अधिक रुचकर लागते.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/