देशभरात साजऱ्या झालेल्या थरारक सीझननंतर कॉमिक कॉन इंडिया आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षीत एडिशनसाठी - मारूती सुझुकी एरिना मुंबई कॉमिक कॉन 2025, पॉवर्ड हाय क्रंचीरोल, साठी सज्ज आहेत. हा कार्यक्रम 12- 13 एप्रिल रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या वर्षाच्या कॉमिक कॉन सीझनचा ग्रँड फिनालेमध्ये पॉप कल्चरचा अनोखा अनुभव मिळणार असून त्यात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कॉमिक क्रिएटर्स, खास परफॉर्मन्सेस, कॉमिक्स, गेमिंग व अनेमेचं खास विश्व यांचा समावेश असेल. प्रवेश केल्यानंतर व्हिजिटर्सना इमेज कॉमिक्सचे रॅडिएंट ब्लॅक क्रमांक 1 च्या इश्यू, येन प्रेसचे सोलो लेवलिंग पोस्टर आणि खास कॉमिक कॉन इंडिया बॅग मिळेल. सुपरफॅन्सना एक्सक्लुसिव्ह कलेक्टिबल पॅक मिळणार असून त्यात मार्वलच्या डॉ. डूमचे बस्ट, डेडपूल आणि वुल्वरिन टी- शर्ट व कीचेन, कॉमिक कॉन इंडिया पझल, हिरोचे केप व इतर डिस्नी लायसन्सिंगच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या गुडीजचा समावेश असेल.

मुंबई कॉमिक कॉन चाहत्यांना जगभरातील त्यांच्या आवडत्या कॉमिक क्रिएटर्सना भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देईल. त्यामध्ये कोनान द बार्बेरियनचे प्रसिद्ध लेखक तसेच मार्वल, डीसी, डिने आणि कॅपकॉमसाठी लक्षणीय काम केलेले जिम झब तसेच रॉब डेनब्लायकर- जगभरात नावाजल्या गेलेल्या सायनाइड आणि हॅपीनेस फ्रँचाईझीचे को- क्रिएटर आघाडीवर आहेत. त्याशिवाय भारतातील प्रसिद्ध कॉमिक बुक क्रिएटर्सही हजेरी लावणार असून त्यात अभिजीत किनी स्टुडिओज, इंडसव्हर्स, चॅरियट कॉमिक्स, याली ड्रीम क्रिएशन्स, गार्बेज बिन, ग्राफिकरी, राजेश नागुलाकोंडा, बुल्सआय प्रेस, लिलरॉश, आर्ट ऑफ सॅव्हियो, कॉरपोरट, हॅपीफ्लफ, यु अँड व्ही वर्क्स, अर्बन टेल्स, बकारामॅक्स, टॅडेम ग्याडू, सौमिन पटेल या व अशा इतरांचा समावेश असेल.

कॉमिक्सबरोबर मुंबई कॉमिक कॉनमध्ये मनोरंजनाचा खजिना असेल आणि तो भारतातील मनोरंजनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या मुंबईसाठी अगदी योग्य असेल. स्टँड- अपपासून संगीत आणि गेमिंगपर्यंत हे शहर लाइव्ह इव्हेंट्स आणि पॉप कल्चर अनुभवांसाठी प्रसिद्ध आहे. साहजिकच सर्वोत्तम परफॉर्मन्सेससाठी यासारखं दुसरं स्टेज नाही. स्टँड-अप क्षेत्रातील दिग्गज रोहन जोशी, साहिल शहा, बिश्वा कल्याण रथ, राहुल दुआ व द इंटरनेट सेड सो (टीआयएसएस) वरूण ठाकूर, कौतुक श्रीवास्तव, नेविल शहा आणि अदर मलिक त्यांच्या जबरदस्त आणि अनफिल्टर्ड विनोदासह धमाल उडवून देतील. त्याशिवाय गीक फ्रुट आणि डिपेंडंट आर्टिस्ट आपल्या कमालीच्या संगीताने अनोखे वातावरण तयार करतील. शिवाय मूझ X अफ्सर आणि जगप्रसिद्ध डीजे काझू हे मनोरंजन असंच अखंड सुरू ठेवतील.

कॉमिक कॉन इंडियाचे संस्थापक जतिन वर्मा म्हणाले, ‘मुंबई शहराने कायमच पॉप्युलर कल्चर आपलेसे केले आहे. कॉमिक कॉन इंडिया सीझनच्या ग्रँड फिनालेनिमित्त आम्ही सर्वोत्तम कॉमिक क्रिएटर्सना एकत्र आणत वेगळा अनुभव मिळवून देणार आहोत. यातून प्रत्येक चाहत्याला अविस्मणीय अनुभवता येतील अशी खात्री आहे. डाय- हार्ड कॉमिक बुक प्रेमींपासून गेमिंगप्रेमीं व अनिमे सुपरफॅनपर्यंत सर्वांना वेगळ्या पातळीवरचे फॅनडम अनुभवता येणार आहे.’