Close

कोक स्‍टुडिओ भारतकडून आसामच्‍या संगीत वारसाचे आधुनिक व्‍हर्जन असलेले गाणे ‘होलो लोलो’ लाँच (Coke Studio Bharat launches ‘Holo Lolo’, a modern version of Assamese musical heritage)

कोक स्‍टुडिओ भारत या विविध संगीत शैलींच्‍या संयोजनाला साजरे करणाऱ्या प्रतिष्ठित प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या तिसऱ्या सीझनचे दुसरे गाणे 'होलो लोलो' लाँच केले आहे. हे तालबद्ध गाणे फंदी (हत्ती प्रशिक्षक)च्‍या विश्‍वाला सादर करते. लोकसंगीत व समकालीन साऊंड्सच्‍या फ्यूजनच्‍या माध्‍यमातून कोक स्‍टुडिओ भारत या कालातीत बंधाला प्रत्‍यक्षात आणत आहे, ज्‍यामधून उत्‍साहपूर्ण सोनिक व व्हिज्‍युअल अनुभव मिळतो. शंकूराज कोनवार आणि शाल्‍मली खोलगडे यांनी गायलेल्‍या या गाण्‍यामध्‍ये आसामच्‍या हिंदीसोबतच्‍या प्रादेशिक पैलूचे संयोजन आहे, जे फंदी आणि त्‍याचे हाथी साथी यांच्‍यामधील सखोल नात्‍याला सादर करते.
एकांत, तळमळ आणि निसर्गाच्या हाकेला साद देत आसामच्या मोरन समुदायाच्या खोलवर रुजलेल्या परंपरा फंदीची गाथा प्रकाशझोतात आणते, जो आपल्या आयुष्यभराच्या साथीदारासाठी म्‍हणजेच त्याच्या हत्तीसाठी कुरण शोधण्‍याकरिता महिनोंमहिने घनदाट जंगलात आणि उंच डोंगरांमध्ये फिरतो. ते एकत्र प्रवास करत असताना तो आपल्‍या मनातील गोष्‍टी या गाण्‍यामधून व्‍यक्‍त करतो, दरीत वाट पाहणाऱ्या व्यक्‍तीसाठी प्रेम व्‍यक्‍त करतो. कोक स्टुडिओ भारत तोरानी गावातील या मार्मिक गाथेला 'होलो लोलो'च्‍या माध्‍यमातून पुन्‍हा जागृत करत आहे, ज्‍यामध्‍ये भावनिक सूर आणि आकर्षक दृश्ये समाविष्‍ट आहेत. आधुनिक लँडस्केपसह पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोककथांना एकत्र करून हे गाणे गतकाळ व वर्तमानकाळामधील तफावत दूर करते, आजच्या काळातील प्रेक्षकांशी संलग्‍न होते आणि शाश्‍वत वारशाचे जतन करते.
शंकरराज कोनवार म्‍हणाले, ''होलो लोलो प्रत्‍यक्षात आणणे सन्‍माननीय आहे. प्रादेशिक संगीत आज अग्रस्‍थानी आहे आणि कोक स्‍टुडिओ भारत भारतातील संपन्‍न परंपरांचा अवलंब करत ही गोष्‍ट साध्‍य करत आहे. हे गाणे आसामच्‍या इतिहासाला मानवंदना आहे आणि मला या प्‍लॅटफॉर्मचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे, जो प्रादेशिक आर्टिस्‍ट्सना राष्‍ट्रीय मंच देतो, देशभरातील आपल्‍या मूळ संस्‍कृतींना आणि संगीताला पुढे घेऊन जातो.''
शाल्‍मली खोलगडे म्‍हणाल्‍या, ''लोकसंगीत कालातीत आत्‍मा आहे आणि होलो लोलोमध्‍ये समकालीन साऊंडसह आसामी वारसाचे सुरेख संयोजन आहे. कोक स्‍ट‍ुडिओ भारत स्‍पेस तयार करत आहे, जेथे लोकसंगीत संपन्‍न होण्‍यासोबत अधिकाधिक प्रेक्षकांशी संलग्‍न होईल, ज्‍यामुळे पारंपारिक साऊंड्सना नवीन ओळख मिळेल आणि आजच्‍या श्रोत्‍यांना पाहिजे असलेले मनोरंजन मिळेल.''
कोका-कोला इंडियाचे आयएमएक्‍स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्‍स्‍पेरिअन्‍स) लीड शंतनू गंगाणे म्‍हणाले, ''संगीतामध्‍ये इतिहासाला गायनाच्‍या माध्‍यमातून सादर करण्‍याची क्षमता आहे आणि कोक स्‍टुडिओ भारत हीच गोष्‍ट करत आहे. सीझन ३ गाण्‍यांपेक्षा अधिक असून भारतात त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या गाथा सादर करत आहे. होलो लोलो आसामच्‍या वारसाला पुढे घेऊन जाते आणि नवीन आवाज देत सिद्ध करून दाखवते की परंपरा फक्‍त लक्षात ठेवण्‍यापुरती मर्यादित नसून पुन्‍हा जगली देखील पाहिजे. शंकूराज व शाल्‍मली यांना ऑनबोर्ड करण्‍यासह आम्‍ही या प्रबळ गाथा कमी न होता वाढत जाण्‍याची खात्री घेत आहोत.''
कोक स्‍टुडिओ भारत सीझन ३ संगीतमय कथानकाच्‍या मर्यादांना दूर करते, ज्‍यामध्‍ये सर्वोत्तम अनुभव निर्माण करण्‍यासाठी संपन्‍न कथानक व प्रबळ व्हिज्‍युअल्‍सचे संयोजन आहे. भारतातील सांस्‍कृतिक साऊंडस्‍केपवर अधिक फोकस देण्‍यासह हा सीझन जीवनातील भावनांना कॅप्‍चर करतो. सीझन सुरू होत असताना अधिक गाथा, अधिक आवाज आणि अधिक संगीतासाठी आमच्‍याशी जुडलेले राहा, जे देशभरातील प्रेक्षकांना प्रेरित करण्‍यासोबत त्‍यांच्‍याशी कनेक्‍ट होतात.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/