नारळ भेंडी
साहित्यः 500 ग्रॅम भेंडी (उभी चिरलेली), 2 कप किसलेला ओला नारळ, 2 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून धणे-जिरे पूड, 2 टीस्पून एव्हरेस्ट शाही गरम मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार.
कृतीः पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व हिंग टाका. जिरे तडतडल्यानंतर भेंडी, हळद व मीठ टाका. 5-7 मिनिटे शिजवा. एका भांड्यात खोबरं, एव्हरेस्ट शाही गरम मसाला, धणे पूड, लाल मिरची पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. हे मिश्रण भेंड्यात टाकून 2 मिनिटे शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.
पालक पुदिना छोले
साहित्य: 3 कप रात्रभर पाण्यात भिजवलेले काबुली चणे, 2 जुड्या पालक (उकडून पेस्ट बनवा.), अर्धी जुडी पुदीना (उकडून पेस्ट बनवून घ्या.), पाव कप क्रीम, 2 टेबलस्पून बटर, मीठ चवीनुसार.
मसाल्यासाठी: 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, 3 टेबलस्पून काजू, प्रत्येकी 2 तुकडे दालचिनी, लवंग व वेलची.
इतर साहित्य: 2 कांदे, 1 आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून लसूण पेस्ट, 2 टीस्पून एव्हरेस्ट चणा मसाला, अर्धा टीस्पून साखर, 1 लिंबाचा रस.
गार्निशिंगसाठीः थोडीशी क्रीम, कोथिंबीर, कांदा.
कृती: मसाल्याचे साहित्य भाजून त्याची पेस्ट बनवून घ्या. सगळे साहित्य एकत्र करून वाटून घ्या. एका पॅनमध्ये बटर गरम करून दोन्ही तयार केलेल्या पेस्ट टाका व परतून घ्या. पालक व पुदिना प्युरी, उकडलेले काबुली चणे व मीठ घालून 5-7 मिनिटे शिजवा. कोथिंबीर, क्रीम व कांद्याने सजवून सर्व्ह करा.