साहित्य : 4-5 लसूण पाकळ्या, 2 कांदे बारीक कापलेले, 3-4 बारीक कापलेली हिरवी मिरची, 3 वेगवेगळ्या रंगातील ढोबळी मिरची (लाल, पिवळी आणि हिरवी), 150 ग्रॅम शिजवलेले चिकन, 1 टीस्पून धणे पावडर, प्रत्येकी अर्धा टीस्पून जिरे पावडर व आमचूर पावडर, 2 टीस्पून मिरची पावडर, ब्रेड स्लाइस, तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : कढईत तेल गरम करून कापलेला कांदा, लसूण आणि मिरची चांगली परतून घ्या. यात सिमला मिरची आणि शिजलेले चिकन टाकून परता. आता मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर आणि सफेद सॉस टाकून क्रिमी आणि मसालेदार मिश्रण तयार करा. पाण्यामध्ये बे्रडचे स्लाइस बुडवा. चमच्याच्या साहाय्याने ब्रेड दाबून त्यातील पाणी काढून टाका. यात चिकनचे मिश्रण भरून गोल आकार द्या. हे गोळे तेलात तळून घ्या. सर्व्ह करताना गोळ्याचे दोन भाग करा आणि सॉससह सर्व्ह करा.
चिकन रोल (Chicken Roll)
Link Copied