Close

चीज स्टफ्ड पोटॅटो आणि चटपटीत आलू (Cheese Stuffed Potatoes And Spicy Potatoes)

चीज स्टफ्ड पोटॅटो
साहित्य: 4-5 उकडलेले बटाटे, 4 चमचे किसलेले चीज,अर्धा कप दूध, मीठ आणि चवीनुसार काळी मिरी पावडर.
कृती : बटाटे न सोलता त्याचे दोन तुकडे करा. नंतर बटाट्यांना मधून स्कूप करून वाटीसारखे खोलगट तयार करावे. बटाट्याच्या स्कूप केलेल्या भागामध्ये चीज, दूध, मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. हे मिश्रण बटाट्यामध्ये भरून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करावे.

चटपटीत आलू
साहित्य: अर्धा किलो बटाटे उकडून सोललेले, 1 टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ
सारण 1: 1 वाटी मोड आणून उकडलेले मूग आणि हरभरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि चाट मसाला
(सर्व साहित्य मिसळा).
सारण 2: 1 वाटी उकडलेल्या भाज्या (गाजर, फरसबी, मटार), चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि 1 टीस्पून लिंबाचा रस (सर्व साहित्य मिसळा).
सर्व्ह करण्यासाठी: दही, हिरवी चटणी, आंबट-गोड चटणी, कोथिंबीर
कृती- कुस्करलेले बटाटे, मीठ, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस नीट मिक्स करा आणि त्यांना चपटा आकार देऊन त्याचे तीन बेस तयार करा. त्यावर पहिल्या सारणाचे मिश्रण ठेवा आणि चांगले पसरवा. आता त्यावर दुसरा बटाट्याचा बेस ठेवा आणि त्यावर दुसर्‍या सारणाचे म्हणजेच उकडलेल्या भाज्यांचे मिश्रण ठेवा. शेवटी, बटाट्याचा तिसरा बेस ठेवा. वरून दही, आंबट-गोड आणि हिरवी चटणी घाला. कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/